शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अन् शेतकºयांनी केली कोरड्या शेतात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:35 IST

येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते.

ठळक मुद्देपाऊस बरसेना चिंता संपेना : करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : येथील शेतकरी अशोक सोमाजी शहारे यांनी शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने हलक्या धानाचे पºहे टाकले होते. मात्र, पºयांना ३० दिवसांचा कालावधी लोटला असतांना रोवणी लायक पाणी आले नाही. त्यामुळे वाळलेल्या नर्सरीतून रोपे काढून चिखलणी न करता वाफसा स्थितीमधील जमिनीवर शेततण विरहित करुन दोरीच्या सहायाने भात रोपांची लागवड केली. हा करडी परिसरातील पहिला धाडसी प्रयोग असून परिणामाकडे शेतकºयांचे व कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा या भागात नाहीत. निसर्गावर येथील शेती अवलंबून आहे. परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या बरीच असतांना तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते. यावर्षी मोहाडी तालुक्यात १ जुन ते २९ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७२ टक्के आहे. त्यातच वरठी १०२ टक्के, करडी ४८ टक्के, कांद्री ५१ टक्के, कान्हळगाव ४० आंधळगाव ६३ टक्के आहे. परिणामी अजुनही तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. नाले पाण्याविणा कोरडी आहेत. शेतकºयांच्या शेतबोळीत, शेततळ्यात पाहिजे तसा पाण्याचा साठा निर्माण झालेला नाही.करडी परिसरात यावर्षी आठवड्या अगोदर या हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी सुरु केली असतांना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे रोवण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षत असतांना रोपांचा कालावधी महिना दिड महिन्यांवर आला आहे. शेतकºयांना कोरड्या दुष्काळाच्या चिंता सतावत आहे. शहारे यांची फक्त अर्धा एकर कोरडवाहू शेती करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राच्या समोर रस्त्याला लागून आहे. यांनी यावर्षी हलक्या धानाची पºहे टाकली. पºहांना कालावधी महिन्याभराचा झालेला असतांना शेती रोवायची कशी याची चिंता सतावीत असताना कोरड्या निसर्गाला न घाबरता शेतीत रोवणा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. २८ जुलै रोजी त्यांनी ओल्या असलेल्या शेतीतील पºहे काढले. शेतात पाणी नसल्याने त्यांनी चिखलनीच्या भानगडी न करता रोपे जमिनीत गाडण्यासाठी नागरडी केली. शेत तणविरहित केले. चरे पडलेल्या खोलगट भागात धान पिकांची रोपे दोरी लावून रोवली. करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रोपांची मुळे जमिनीत गाडण्याचा सल्ला दिला. प्रयोगाचे कौतुक होत असून पाऊस लांबणीवर पडल्याने हा प्रयोग यशस्वी होणार काय, याकडे शेतकरी व कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.