शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतशिवारात पीक काढण्याची लगबग, पण मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी ...

अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी यंत्रांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना जादा पैसे देऊन लवकर पिकांची कापणी करीत आहेत. काही गावांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मजूर कोरोनाच्या भीतीने कामास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे एकीकडे मजूर मिळतात, तर दुसरीकडे मळणीसाठी मशीन मिळत नाही. मशीन मिळालीच तर मजूर उपलब्ध होत नाहीत. अशी दुहेरी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी, खराडी, माटोरा, मानेगाव बाजार खुटसावरी, शहापूर, नांदोरा परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रबी हंगामातील गहू, हरभरा पिकाचे चांगले उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासोबतच खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसलेला फटका यामुळे आणि रबी हंगामातील पिकांवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. कोरोना संसर्ग तर दुसरीकडे वाढत्या महागाईने शेतकरी संकटात सापडला आहे.

डिझेलच्या वाढत्या दराने शेतकरी त्रस्त एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या डिझेल पेट्रोलच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांना मदनी पिकाच्या कापणीसाठी अधिकचा दर मोजावा लागत आहे. प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा दर द्यावा लागत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सोसावा लागत आहे. यंदा डिझेलच्या दरवाढीने आणि शेतमजूरही जास्तीचे पैसे मागत आहेत त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

कोट

रबी हंगामातील पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले होत आहे. मात्र, यावर्षी डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्यांसह मळणी यंत्र मालकांनाही बसत आहे.

श्रीकांत वंजारी

परसोडी, ता.भंडारा, मळणीयंत्र मालक.

कोट

प्रत्येक गोष्टीतच महागाई वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, अतिवृष्टी मदत, तसेच पीक कर्जमाफी अजूनही दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही.

विष्णुदास हटवार

शेतकरी तथा तंटामुक्ती अध्यक्ष, चिखली.