शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

डाळ वाटपात सर्वसामान्यांना फटका

By admin | Updated: November 16, 2015 02:07 IST

‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे.

वाढती महागाई : स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये भाव तुमसर : ‘दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गावों, असे गीत प्रचलित आहे. परंतु तूर डाळ आता श्रीमंतीचे लक्षण दिसत आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शासनाने डाळ उपलब्ध करुन दिली असली तरी ती प्रति किलोग्रॅम १३० अशी आहे. बाजारात डाळीची किंमत १५० किलोग्रॅम आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात सामान्य ग्राहकांनी डाळीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. देश तथा राज्यात अचानक डाळीचे भाव वाढले, भाव कमी होण्याचे मार्ग बंद झाल्यासारखेच झाले. सणासुदीचे दिवस पुढे येऊ न ठेवले. शासनावर दबाव वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना डाळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून डाळ वितरीत करण्यात येईल अशी घोषणा शासनाने केली. या तूर डाळीची किंमत १३० रुपये किलो ग्रॅम इतकी ठेवली. सामान्य ग्राहकांनी सणासुदीच्या दिवसात अर्धा ते एक किलो ग्रॅम एवढी डाळ खरेदी केली. बाजारात तूर डाळीची किंमत सध्या १५० रुपये किलोग्रॅम इतकी आहे. केवळ २० रुपयाचा येथे फरक आहे.अनेक स्वस्त धान्य दुकानात सध्या तूर डाळीचा साठा उपलब्ध आहे. सर्वसामान्य गरिबांनी तांदूळ व गहू खरेदी केली. डाळ हा घटक अनिवार्य नाही अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिल्या. जप्त केलेली तुर दाळ केवळ १०० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री करण्यात आली. तीही केवळ शहरी भागात, परंतु ग्रामीण भागात आजही तुरदाळ चढ्या भावानेच विक्री केली जात आहे. पूर्व विदर्भात एकाही ठिकाणी साठा जप्त करण्यात आला नाही. अन्न पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री तपासणी केली असावी. शासन स्तरावर किमान स्वस्त धान्य दुकानातून ७० ते ८० रुपये किलोग्रॅम तुरडाळ सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज होती. दिवाळीसारख्या मोठया सणाला राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानातून डाळ उपलब्ध करुन दिली परंतु डाळीचा भाव जास्त आहे. सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. आपले स्वस्त धान्य दुकानात डाळीचा साठा जप्त आहे. (तालुका प्रतिनिधी)