भंडारा : मध्यंतरी आटोक्यात असलेल्या सर्वच डाळीचे दर मागील आठवड्यात पुन्हा वधारले आहेत. वाढीव दरामुळे बाजारात ग्राहकांचा अभाव आहे. यंदा गहू आणि तांदळाला पावसाचा फटका बसला असून मालाचा दर्जा खालावला आहे. चिन्नोर तांदळाची विक्री वाढली आहे. पावसामुळे तुरीचे पीक खराब झाल्याने तूर डाळ वधारली आहे. दोन महिन्यापूर्वी किरकोळमध्ये ७५ ते ८० रुपयांवर असलेली तूर डाळ आता थेट १०० रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीच्या शक्यतेने डाळ गरिबाच्या ताटातून गायब झाली आहे. (नगर प्रतिनिधी)पावसाचा फटकायावर्षी मार्चमध्ये विदर्भात गारांसह कोसळलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे तूर, चणा, वाटाणा, मसूर, मूग आदी पीक खराब झाले. एक महिन्यातच तूरीचे दर पाच हजार रुपयांवरून सात हजारांवर पोहोचले आहेत. कर्नाटक तूर ६,३०० रुपये आणि बर्मा येथील आयातीत तूर ६,००० वर असून वाहतुकीच्या खर्चासह प्रति क्विंटल दर ६,५०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती धान्य विक्रेते अनिल चरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. किरकोळमध्ये तूर डाळ ११०! महिन्याचा शेवट असतानाही भंडारा बाजारात तूर डाळ दर्जानुसार प्रति किलो ८,२०० ते ९,५०० रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये दर १०० रुपयांवर पोहोचल्याने गरीब, मध्यमवगीर्यांनी खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी वाटाणा डाळ आणि लाखोळी डाळीची खरेदी वाढविली आहे. ठोकमध्ये वाटाणा डाळ प्रति क्विंटल ३,००० ते ३,२०० रुपये, बटरी डाळ ४,२०० ते ४,५०० रुपये आणि लाखोळी डाळ ३,१०० ते ३,३५० रुपये आहे. या डाळीला गरिबांकडून मागणी वाढल्यास पुढील महिन्यात प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांची वाढ होऊ शकते, असे चरडे म्हणाले. गव्हाचा रंग फिकापावसामुळे गव्हाला नुकसान झाले असून गव्हाचा रंग फिका पडला आहे. मागील वर्षी गुजरात येथून जास्त प्रमाणात धान्य आल्याने भाववाढ झाली नव्हती, पण यावर्षी मात्र स्थिती विपरीत आहे. भंडारा बाजारात प्रति क्विंटल भाव खालीलप्रमाणे आहेत. एमपी शरबती ३,५०० ते ३,९००, मीडियम सुपर बेस्ट ३,१५० ते ३,३५०, हलके गहू १,९०० ते २,१००, बेस्ट लोकवन राजस्थान २,३०० ते २,४००, एमपी लोकवन १,८५० ते २,०००, राजस्थानी तुकडी बेस्ट २,३५० ते २,४५०, मीडियम बेस्ट २,२०० ते २२५०.तांदळाचे भाव स्थिरनवीन चिन्नोर (कालीमूछ) तांदळाच्या किमती वधारल्या आहेत. ठोकमध्ये बेस्ट चिन्नोर ४,६०० ते ४,८००, मीडियम बेस्ट ४,३०० ते ४,५००, मीडियम ४,००० ते ४,२००, जयश्रीराम मीडियम ३,७०० ते ४,०००, बेस्ट ४,२०० ते ४,५००, एचएमटी ३,१०० ते ३,७००, बीपीटी २,५०० ते २,८००, सुवर्णा मीडियम २,०५० ते २,१५०, बेस्ट २,२०० ते २,४००, जुने तांदूळ चिन्नोर ५,५०० ते ६,०००, जयश्रीराम ४,५०० ते ५,२००, एचएमटी ३,८०० ते ४,२०० आणि बीपीटीचे भाव ३,१०० ते ३,३०० रुपये होते. मूग डाळ १२०!उन्हाळ्यात पापड आणि दक्षिण भारतीय पक्वान्नांसाठी सर्वाधिक मागणीचे उडद आणि मूग मोगरच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मूग मोगर दजार्नुसार प्रति क्विंटल दर ९,८०० ते ११ हजारांवर तर उडद मोगरचे दर प्रति क्विंटल ७,५०० ते ८,५०० रुपयांदरम्यान आहेत. याशिवाय मध्य प्रदेशात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने मसूर डाळीचे दर ६,८०० ते ७,४०० रुपयांवर गेले आहेत. आवक कमी असल्याने चणा ४,५०० रुपयांवर गेला आहे. मागीलवर्षीसुद्धा पावसामुळे चण्याची गुणवत्ता खालावल्याने दर २,४०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे अनेकांनी काबुली चण्याची पेरणी केली आहे. सध्या ठोकमध्ये चणा डाळीचे भाव पाच हजारांवर पोहोचले आहेत.
सर्वच डाळीचे दर पुन्हा वधारलेपावसामुळे पीक खराब : गहू व तांदळात वाढ, सर्वसामान्यांचे बिघडले अंदाजपत्रक
By admin | Updated: May 3, 2015 00:40 IST