शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या उत्थानासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: February 4, 2017 00:21 IST

कुठलाही समाज मनुष्याच्या उन्नतीकरीता नेहमी प्रयत्नशील असतो. मात्र आपण समाजासाठी काय चांगले करू शकतो, यावर सर्वांनी विचार केला पाहिजे.

तारिक कुरैशी यांचे आवाहन : शिवहरे कलार समाजातर्फे वसंतपंचमी उत्सवभंडारा : कुठलाही समाज मनुष्याच्या उन्नतीकरीता नेहमी प्रयत्नशील असतो. मात्र आपण समाजासाठी काय चांगले करू शकतो, यावर सर्वांनी विचार केला पाहिजे. जिल्ह्यातील खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी भाजप पक्षाचे आहेत. या सर्वांनी मिळून शिवहरे कलार समाजाच्या उत्थानाकरिता भरीव मदत केली पाहिजे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. शिवहरे कलार समाज सेवा समिती भंडाराच्या वतीने १ फेब्रुवारीला स्टेशन मार्गावर स्थित शिवहरे कलार समाज भवनात वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय स्थानाहून बोलत होते. यावेळी मंचावर नागपूरचे उद्योगपती दिपक जयस्वाल, कैलाश नशिने, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने, विक्रम उजवणे, रमनलाल उजवणे, समितीचे संयोजक मुकेश थानथराटे, समितीचे अध्यक्ष विनोद थानथराटे, चंद्रकांत पशिने, ललीत कटकवार, प्रविण उजवणे, शैलेंद्र पशिने, टिकाराम खुबेले (रायबरेली), छत्तीसगड कलार समाजाचे अध्यक्ष गौरीशंकर शिवहरे, राजन कटकवार आदी उपस्थित होते.उत्सवाचे उद्घाटन श्री. सहस्त्रबाहू यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आले. या वसंत पंचमी उत्सवात दोन जोडपी विवाहबद्ध झालीत. शिवहरे समाजाच्या इच्छूक वर-वधूंनी मंचावर येवून परिचय दिला. यादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने व विक्रम उजवणे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. समाजाचे मुख्य कार्यकर्ता अशोक कटकटवार यांचाही शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून मुकेश थानथराटे यांनी २०१९ पर्यंत शिवहरे कलार सांस्कृतीक भवनाचे कार्य पुर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच समाज बांधवांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी परिसराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याचवेळी गोंदिया येथील रहिवासी गणेश उजवणे यांनी समाजाच्या इमारत बांधकामासाठी अडीच लक्ष रूपये देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन मंजू थानथराटे, लोकेश मोहबंशी, प्रविण उजवणे व मुनमून नशिने यांनी केले. आभार समितीचे अध्यक्ष विनोद थानथराटे यांनी मानले. उत्सवासाठी मनोज उजवणे, नितीन कारवट, सुनिल पशिने, सुरेश राजाभोज, विनोद शिवहरे, विनोद नशिने, अशोक राजाभोज, राजा थानथराटे, संजय कटकवार, नविन उजवणे, अशोक टंडेय्या, राजा कटकवार, प्रकाश थानथराटे, विरेंद्र कटकवार, गुरूदत्त पशिने, अजित उजवणे, हितेश राजाभोज, रौणक उजवणे, बॉबी कटकवार, तुषार कटकवार, दिनेश कटकवार, रूपा शाह, रश्मी उजवणे, गीता कटकवार, राणी राजाभोज, कल्पना शिवहरे, संध्या थानथराटे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)