शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर परिसरातील ‘ढेंच्च्या’ हिरवळीचे खत वापराने शेती होते सुपीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

हिरवळीच्या खताने जमीन कोवळी होऊन सुपीक बनते. सुपीक जमीन पिकाला सकारात्मक ऊर्जा देते. रोगराइर्पासून बचाव करते. पर्यायाने कीटकनाशकांचा खर्च वाचून शेती कमी खर्चाची कसायला मोठी मदत होते. पूर्वीच्या काळी रासायनिक खत नसताना केवळ सेंद्रिय व हिरवळीच्या खताच्या भरवश्यावरच शेती उत्तम प्रकारे कसली जायची. त्यामुळे पिकात विष नसायचे. विषमुक्त अन्न मिळायचे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे मार्गदर्शन; रासायनिक खताला अल्पप्रतिसाद

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : रासायनिक खतांची मात्रा कमी करून हिरवळीच्या खताचा उपयोग करीत जमिनीचे आरोग्य सुधारणेकरिता कृषी विभाग सरसावला आहे. पालांदूर व परिसरात कित्येक शेतकऱ्यांनी हिरवळी खताचा वापर करीत जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खत कमी वापरत उत्पादन खर्चात बचत करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्याची अंमलबजावणी चूलबंद नदी खोऱ्यात केली जात आहे.दिवसेंदिवस रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. रासायनिक खतांच्या अवाढव्य किमतीमुळे उत्पादन खर्चात भरीव वाढ झालेली आहे. खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव निश्चितच कमी आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत खत कंपन्यांनी खतांच्या किमती अतोनात वाढवल्या आहेत. कोरोनाचे संकट व परदेशातून कच्च्या मालाचे वाढलेले भाव अशी कारणमीमांसा देत खतांचे भाव वाढवलेले आहेत. शेतकऱ्यांनी स्वावलंबन तत्त्वावर शेती करीत उत्पादनखर्च कमी करण्याकरिता हिरवळीचे खत व सेंद्रिय खताचा वापर वाढविण्याकडे कल वाढविलेला आहे. कृषी विभागाने कापणी ते बांधणीपर्यंतचे इत्थंभूत कृषी ज्ञान शेतकऱ्यांना पुरविलेले आहे. घरगुती बियाणे वापरण्यापासून तर नव्या तंत्रात रोवणीचा अभ्यास दिलेला आहे.हिरवळीच्या खताने जमीन कोवळी होऊन सुपीक बनते. सुपीक जमीन पिकाला सकारात्मक ऊर्जा देते. रोगराइर्पासून बचाव करते. पर्यायाने कीटकनाशकांचा खर्च वाचून शेती कमी खर्चाची कसायला मोठी मदत होते. पूर्वीच्या काळी रासायनिक खत नसताना केवळ सेंद्रिय व हिरवळीच्या खताच्या भरवश्यावरच शेती उत्तम प्रकारे कसली जायची. त्यामुळे पिकात विष नसायचे. विषमुक्त अन्न मिळायचे. परंतु प्रगतिशील युगात तांत्रिक ज्ञानाचा विपर्यास झाल्याने शेतमाल रासायनिक खताच्या अधीन झाली. अधिक उत्पन्नाच्या लालसेने रासायनिक खतांचा वापर वाढला. पर्यायाने उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली. त्या तुलनेत मात्र शेतमालाचे भाव वाढू शकले नाही. 

निरूपायाने शेतकरी कंगाल ठरला- शेतकऱ्याला सुजलाम् सुफलाम् करण्याकरिता स्वत:च्याच शेतात अल्पखर्चात हिरवळीच्या खतांचा वापर वाढविण्याचा सल्ला कृषी विभागाने पुरविला. कित्येक शेतकरी तर स्वतःच्या शेतातच हिरवळी खताचे बियाणेसुद्धा तयार करतात. हंगामात स्वतः इतर शेतकऱ्यांनाही कमी भावात पुरवितात. त्यामुळे शेतकरीवर्गाला कमी खर्चात स्वतःच्याच गावी हिरवळीच्या खताचे बियाणे सहजतेने उपलब्ध होते. पालांदूर, मचारना, मांगली, रेगोळा, कवलेवाडा आदी गावात सोनबोरू या  हिरवळीच्या खताचा बियाणे करून स्वतःसह इतर शेतकऱ्यांना विक्री केला जात आहे.

सोनबोरू अत्यल्प पाण्यात पिकणारे हिरवळीचे खत आहे. एकरी उत्पादन सुमारे २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत येते. याला खर्चसुद्धा अत्यल्प असून नसल्यासारखाच आहे. गत चार वर्षापासून तीन ते चार एकरात सोनबोरू पिकवितो. स्वतःसह इतरही शेतकऱ्यांना पुरवितो. कृषी विभागाने आता पुढाकार घेतला असून, शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळलेले आहेत. -पराग ठवकर, प्रगतिशील शेतकरी, मचारना

 

टॅग्स :agricultureशेती