शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय कार्यालयात शेतीची प्रकरणे रखडली

By admin | Updated: March 18, 2015 00:43 IST

लोकाभिमुख व शेतकरी हिताचे शासन म्हणून कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे गेल्या सहा महिन्यापासून भोजापूर ...

पवनी : लोकाभिमुख व शेतकरी हिताचे शासन म्हणून कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे गेल्या सहा महिन्यापासून भोजापूर येथील शेतकऱ्याचे वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. शेतजमीन वर्ग १ केल्याशिवाय शेतीचे विक्रीपत्र होवू शकत नाही. मुलीचे लग्न, शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता न राहिल्याने शेतीची विक्री करणे हा एकमेव पर्याय त्या शेतकऱ्यांकडे आहे. परंतु उपविभागीय कार्यालय भंडारा येथे प्रकरण प्रलंबित असल्याने शेतजमीन विक्रीचा पर्याय सुद्धा राहिलेला नाही. परिणामी आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागेल असे धमकीवजा पत्र शेतकऱ्याने जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविले आहे.पवनी तालुक्यातील भोजापूर शिवारातील पहनं ३१ गट क्र. १२०, १२१, १२३ ही शेतजमीन वर्ग ए मध्ये असलेले शेतकरी गंगाधर दशरथ लकडस्वार यांनी वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठीचा महिन्याभरापूर्वी उपविभागीय अधिकारी भंडारा यांचे कार्यालयाकडे पाठविला. प्रस्तावात त्रृट्या असल्याचे कारण दाखवून प्रकरण परत आले. त्रुट्यांची पूर्तता करून ते प्रकरण पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर साधारणत: दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे. त्या प्रकरणाचे संदर्भात संबंधित शेतकरी तीन वेळा एसडीओ कार्यालयात गेले परंतु संबंधित कर्मचबारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागून त्यांना परत पाठवितात. शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. मार्चअखेर कर्जमुक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्यांना जमिनीची विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबात १० जणांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांला यापूर्वी नैसर्गिक प्रकोपाचा फटका बसलेला आहे.एकीकडे मोठ्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी, नापिकीमुळे आर्थिक संकट व कर्जबाजारीपणा यावर मात करण्यासाठी शेतकरी शेतजमीन विकायला निघालेला आहे. परंतु ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणून सत्तेत आलेले सरकार व त्यांचा नोकरवर्ग शेतकऱ्यांना जगू देण्याचा मानसिकतेमध्ये नाही अशी शेतकऱ्याची भावना झालेली असल्याने अखेर आत्महत्येची धमकी देण्याची वेळ गंगाधर लकडसवार यांचेवर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)