शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिल्ह्यात कृषी पर्यटनाचे नवे दालन उघडणार, मथाडी शिवारात कामे अंतिम टप्प्यात

By युवराज गोमास | Updated: April 14, 2024 16:44 IST

भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भंडारा : पर्यटन व्यवसाय सर्वत्र झपाट्याने वाढत आहे; परंतु जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अद्यापही कुठेही पर्यटनीय दृष्टीने कामे झालेली नाहीत. कृषी पर्यटनात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने झपाटलेल्या एका तरुणाने ५ वर्षांपासून त्याच्या २५ एकरांतील खासगी शेतात 'पाटीलवाडी कृषी पर्यटन' या नावाचे नवे दालन सुरू करण्याचा खटाटोप चालविला आहे. त्या तरुणाचे नाव गणेश शेंडे, रा. भंडारा, असे आहे.

भंडारा कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत गणेश शेंडे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कृषी क्षेत्रात झालेले बदल अनुभवले. कृषीतून निर्माण झालेला पर्यटनीय विकास पाहिला. तीच संकल्पना भंडारा जिल्ह्यातही राबवावी, या हेतूने मागील पाच वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी पर्यटन विकासासाठी त्यांनी भंडारा शहरापासून अवघ्या आठ किमी, तर भंडारा ते अड्याळ मार्गावरील पालगाव फाटावरून ३ अंतरावरील मथाडी (पालगाव) शेतशिवाराची निवड केली. खडतर प्रयत्नातून त्यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केला.

निव्वळ शेतीवर अवलंबूून न राहता परिसरातील मजुरांनाही रोजगार देता यावा, या उद्देशाने त्यांनी २५ एकर शेतापैकी ५ एकर शेतीवर कृषी पर्यटनाचा विकास केला. हिरवेगार प्रशस्त लॉन, कार्यक्रमांसाठी बैठक सुविधा, मुलांसाठी खेळणे, उडणारे कारंजे, भाेजन सुविधांची उभारणी केली. नौकाविहार, फळ व फुलझाडे, फुलशेती, मत्स्यपालन, बदक व कुक्कुटपालन आदी रोजगाराभिमुख उपक्रमही सुरू केले. नाला काठावरील शेतीचा विकास करीत हिरवेगार रान फुलविले. शेतात पाऊल ठेवताच प्रसन्नतेचा व निसर्ग सान्निध्याची अनुभूती मिळते. कृषी पर्यटकांच्या आवडीनुसार भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे.

पीक पद्धतीत केले नवनवे प्रयोग -जिल्ह्यात धान शेतीला विशेष महत्त्व आहे; परंतु या शेतीव्यतिरिक्त अन्य पिकांतून मिळणारे उत्पन्न मोठे असते. त्यासाठी त्यांनी नवनवे प्रयोग केले. ठिबक सिंचन व मल्चिंगवर २० एकरांत विविध प्रकारची शेती फुलविली आहे. ३ एकरांत पपई, २ एकरांत केळी, २ एकरांत काकडी, २ एकरांत चवळी, २ एकरात टरबूज, दीड एकरात खरबूज, तर ३ एकरांत मत्स्यपालन व मत्स्यबीजनिर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे चांगले उत्पन्नही हाती पडत आहे.

३० मजुरांना मिळतोय बारमाही रोजगार -विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, या जाणीवजागृतीसाठी गणेश शेंडे यांनी स्वत: सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा रोजगारनिर्मितीवर खर्च होत आहे. सध्या परिसरातील ३० महिला व पुरुषांना त्यांच्या कृषी क्षेत्रातून रोजगार दिला जात आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रtourismपर्यटन