शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला, सामान्यांनी जगायचे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा शेती व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व इतर भाज्या, फळे बाहेरील जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आणि डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता भाजीपाला महागला असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांदे ३० रुपये किलो, तर बटाटे ४० रुपये किलो, टोमॅटो २५ रुपये, वांगे ३० रुपये किलो, पालेभाज्या १५ रुपये जुडी, भेंडी ३० रुपये किलो असे भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता गृहिणींकडून पुन्हा एकदा कडधान्य, डाळींचा वापर वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमी दरानेच भाजीपाला विकावा लागत आहे. यात व्यापारीच मोठे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

पुन्हा वरणावर जोर

कोट

आज सर्वसामान्य माणसांना जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठवड्याचा भाजीपाला घ्यायचे म्हटले तर दोनशे ते तीनशे रुपये लागतात. त्याऐवजी डाळींचा, कडधान्याचा अधिक वापर सुरू केला आहे. दररोज वरण, उसळ करते. त्यामुळे त्यातल्या त्यात थोडी बचत करता येते.

शशिकला मोथरकर, खरबी.

कोट

आम्ही स्वतः शेतकरी आहोत. मात्र, वन्यप्राण्यांचा उपद्रव असल्याने भाजीपाला कमी केला आहे. अशातच आम्हालाही जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात भाजीपाला पिकवला तरी व्यापाऱ्यांकडून चांगला दर दिला जात नाही.

प्रमिला घाटोळे, खरबी.

म्हणून वाढले दर ...

व्यापारी कोट

बाजारात जिल्ह्यातील भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला हा महागला असल्याने त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.

मनीष बुरडे, भाजीपाला व्यापारी.

व्यापारी कोट

लोकांना असे वाटते की, भाजीपाला विक्रेत्यांकडून अधिक दराने भाजीपाला विकला जातो. मात्र, प्रत्यक्षात आम्हालाही जादा दराने खरेदी करावी लागते. स्वस्तात मिळाल्यास आम्हीही ग्राहकांना कमी दराने विकतो.

विनोद वाडीभस्मे, भाजीपाला व्यापारी.

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच...

कोट

मी कारले, चवळी, भटई वांग्याची लागवड केली होती. याला चांगला दरही मिळाला. मात्र, आता इथून पुढे लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेलच याची खात्री नाही. शासनाने खतांचे, बियाण्यांचे दर कमी करायला हवेत.

तानाजी गायधने, भाजीपाला उत्पादक शेतकरी, चिखली.

कोट

भाजीपाला लागवड फायदेशीर ठरते. मात्र, कोरोना परिस्थितीत मजूर मिळत नव्हते. इतर कामातही अडचणी येत होत्या. यावर्षी धानाचे क्षेत्र कमी केले आहे. आता भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे विक्रीला भाजीपाला येईपर्यंत दर किती राहतो हे सांगता येणार नाही.

पद्माकर चकोले, भाजीपाला उत्पादक शेतकरी, पांढराबोडी.