शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्यांचे जीवन प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:31 IST

जन्मताच डोळे व अन्य व्याधीने ग्रासलेल्या अशा तालुक्यातील १० चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन ...

डॉक्टरांना यश : डोळे व अन्य व्याधींवर केली शस्त्रक्रियाराहुल भुतांगे तुमसरजन्मताच डोळे व अन्य व्याधीने ग्रासलेल्या अशा तालुक्यातील १० चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याची किमया येथील सु.बो. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने करून दाखविली. हर्ष सदानंद बांडेबुचे (३) रा.रोहा ता.मोहाडी, अमन मालाधारी (१२) रा.पाथरी ता.तुमसर, प्रवेश थोटे (१०) रा.तुमसर, पारस शेंडे (८) रा. पवनारखारी, प्रज्वल ठाकरे (११) रा.सिहोरा, मोहीत नागरे (११) रा.पाथरी, आकाश शेंद्रे (१२) रा.आसलपानी, हेमांश देरकर (८) रा.नाकाडोंगरी असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या चिमुकल्या रुग्णांची नावे आहेत.उपजिल्हा रुग्णालय तुमसरचा प्रभार डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी सांभाळला आहे. दुसरीकडे रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात तालुका बाहेरचे व मध्यप्रदेशातील रुग्ण मोठ्या संख्येनी हजेरी लावतात. बाह्य रूग्ण विभाग सांभाळून दहा चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे लक्षात येताच डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी त्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्णांची एकाच दिवशी उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना ग्रासलेल्या अनेक व्याधीपासून बरे केले. हर्ष बांडेबुचे या तीन वर्षीय चिमुकल्याला मोतीयाबिंदूचा आजार गर्भाशयात असताना झाला. त्यामुळे त्याला दिसत नव्हते. मोतीयाबिंदूचा आजार हा सामान्यत: वयाच्या ५० वर्षानंतर होतो. तर बोटावर मोजण्याइतके लोकांना जन्मताच हा आजार होतो. वयोवृद्ध माणसाची शस्त्रक्रिया वेगळी व तीन वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया वेगळी हे ओळखून डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी डॉ.गोपाल सार्वे, डॉ.सिद्धार्थ चव्हाण, डॉ.किशोर मलेवार यांना सोबत घेऊन हर्षच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या जीवनात प्रकश घालण्याचे कार्य केले. त्या चिमुकल्यांच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्या या कर्तृत्वाचे अनेकांनी कौतूकही केले.