शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लग्न होताच नववधू झाली कुटुंबीयासोबत पसार

By admin | Updated: March 21, 2015 01:19 IST

सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा

८० हजारांनी वराला गंडविले : लग्न सोहळा झाल्यानंतरची घटनातुमसर : सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा तालुक्यातील एका तरुणीने लग्नाचे आमिष देऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवतीने मंदिरात लग्न लागल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पळ काढला. युवतीच्या अंगावर सुमारे ८० हजाराचे सोन्याचे दागिने होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याची माहिती आहे.तुमसरातील एका युवकाचे लग्न तिरोडा तालुक्यातील विर्सी फाटा गावातील एका मुलीशी ठरले होते. दोन दिवसापूर्वी मुंडीकाटाजवळील नवेगाव येथील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. वऱ्हाड्याचे भोजनाचा कार्यक्रम सुरु असताना मुलीने प्रसाधनगृहाकडे जातो म्हणून ती गेली, बराच वेळ ती परत आली नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. मंदिरात लग्न लावणारा पूजारी तथा मुलीचे वडील व कुटुंबीय प्रसार झाले होते. युवकाकडील मंडळीना फसवणूक झाल्याचे समजते. वराचा लहान भावाने तुमसर पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु घटना तिरोडा तालुक्याच्या हद्दीतील असल्याने तक्रारकर्त्यांना तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले.वधूच्या अंगावर वराकडून सुमारे ८० हजाराचे दागिने दिले होते. यासंदर्भात तिरोडा येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यावर दूपारी ३ पर्यंत अशी तक्रार आली नाही अशी माहिती दिली. दोन्ही कुटुंबीयाच्या सहमतीने हे लग्न ठरले होते. लग्नात खर्चाला फाटा देऊन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला होता. मंदिरातून युवती कुटुंबीयांसोबत पसार झाल्याने तसे रॅकेट तर येथे सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. अशा घटनेवर आळा बसणे आवश्यक आहे. अशा घटना या परिसरात यापूर्वीसुध्दा घडल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)