आॅनलाईन लोकमतचिचाळ : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला. यात धनराज काटेखाये व भिवा काटेखाये यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, वाटेत वामन जिभकाटे याला धडक दिली यात गंभीररीत्या जखमी झाला असून त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चिचाळ येथे घडली.सुरेश पडोळे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३६ - ६९४०) अंगणात असताना सुरेशचा भाऊ नरेश पडोळे हा मद्यप्राशन करून ट्रॅक्टर सुरु केला. वाटेने जात असलेले वामन जिभकाटे (३०) यांना धडक दिल्याने ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या पायावरून गेले. त्यानंतर भिवा काटेखाये यांच्या पानटपरीला आदळल्याने ट्रॅक्टरचा एक चाक तुटून काटेखाये यांच्या घरात गेल्याने त्यांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे ट्रॅक्टर धनराज काटेखाये यांच्या घरात शिरला. त्यावेळी तिथे असलेली महिला पळून गेल्याने ती बचावली. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली. घटनेनंतर चालक नरेश पडोळे हा घरात दबा धरून बसून होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. या घटनेत सायकल, शेळी व पानटपरीचे, सिमेंटचा खांबाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मालक व चालकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेची माहिती होताच ठाणेदार किचक यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. तपास जमादार शरद गिऱ्हेपुंजे, अनिल नंदेश्वर हे करीत आहेत.
मद्यपि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घरात शिरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:04 IST
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला. यात धनराज काटेखाये व भिवा काटेखाये यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मद्यपि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घरात शिरला
ठळक मुद्देचिचाळ येथील घटना : एक इसम जखमी, घराचे नुकसान