शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:19 IST

उमरेड-कºहांडला अभयारण्य : पवनी गेटचे आकर्षण संपले अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : जंगल दणाणून टाकणारी आरोळी आणि ...

उमरेड-कºहांडला अभयारण्य : पवनी गेटचे आकर्षण संपलेअशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जंगल दणाणून टाकणारी आरोळी आणि रुबाबदार शरीरयष्टीच्या वाघांचा मृत्यू झाल्यानंतर पर्यटकांनी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने येणारा पर्यटकांचा ओघ आता गत महिन्याभरापासून मंदावला आहे. तर दुसरीकडे या दोन वाघांच्या मृत्यूचे गुढ महिन्याभरानंतरही कायम आहे.उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात जय वाघाचा परिवार होता. आशिया खंडात रुबाबदार वाघ म्हणून जयची ओळख होती. त्याचे बछडेही तेवढेच रुबाबदार होते. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पवनी गेट वर दिसत होती. वनपर्यटनासोबत व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. त्यातून वनविभागाला मोठे उत्पन्न मिळत होते. परंतू जय वाघ बेपत्ता झाला. त्याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र चार्जर आणि राही वाघीण या अभयारण्याचे आकर्षण ठरले होते.अनेक पर्यटकांना या वाघाने दर्शन दिले होते. त्यामुळे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकात आवडीचे ठिकाण झाले होते. पंरतु सरत्यावर्षाच्या शेवटी चिचगाव कक्ष क्र. २२६ मध्ये ३० डिसेंबर रोजी चार्जर वाघाचा आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी राही वाघीणीचा मृतदेह आढळून आला. सलग दोन वाघांच्या मृत्यूने वनविभाग हादरुन गेला. या वाघाच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. मात्र महिना झालातरी कोणताच थांगपत्ता लागला नाही.महिन्याभरापूर्वी या दोन वाघाच्या मृत्यूनंतर वन्यजीवप्रेमी हळहळले. आता तर या अभयारण्याकडे पर्यटकांनी जणू पाठच फिरविली आहे. पुर्वी पहाटेपासून पर्यटकांची पवनी गेटवर गर्दी दिसायची. जंगलातही भ्रमंती सुरु असायची. मात्र महिन्याभरापुर्वी चार्जर आणि राहिचा मृत्यू झाला. त्यानंतर पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.आरोपींचा थांगपत्ता नाहीचार्जर आणि राही या दोघ वाघांच्या मृत्यूचा तपास वन्यजीव विभाग करीत आहे. सुरुवातीला या वाघांच्या अवयवांचे नमुणे नागपूरच्या फॉरेन्सीक लॅबकडे पाठविण्यात आले. पंरतू त्यात वाघांच्या मृत्यूचे कारण पुरते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आता या वाघांच्या अवयवांचे नमुणे भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. वनविभागाने अभयारण्यानजिक असलेल्या गावातील अनेक शेतकºयांची चौकशी केली. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. वाघांच्या हत्येची माहिती देणाºयास बक्षीसही घोषित करण्यात आले. पंरतु ठोस काहीच हाती लागले नाही.