शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी कार्यालयाला सुगीचे दिवस

By admin | Updated: August 5, 2015 00:49 IST

सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.

खोल्यांची रंगरंगोटी : चरण वाघमारे यांनी शब्द पाडलाचुल्हाड/सिहोरा : सिहोरा येथील लघु पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीच्या खोलीत हरदोली गावात असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण होणार आहे.सिहोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत मंडळ कृषी कार्यालयाचे जागाअभावी पाच कि़मी. अंतरावरील हरदोली गावात स्थानांतरण करण्यात आले आहे. प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावातून हक्काचा कार्यालय प्रशासकीय कार्यासाठी गावात पडविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांचे संबंधित कार्यालय सिहोरा गावात असताना मंडळ कृषी कार्यालय याच गावात स्थानांतरीत करण्यासाठी परिसरात ओरड सुरू झाली. परंतु कार्यालयाचे स्थानांतरण करताना दोन विभागाची आडकाठी ठरत होती. या आधी मंडळ कृषी कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या बस स्थानक परिसरातील रिकाम्या प्रसस्त इमारतीत स्थानांतरण करण्याची योजना होती. हरदोली गावातील जीर्ण इमारती मधून प्रशासकीय कारभार होत असल्याने कार्यरत कर्मचारी भित भित सेवा देत होती. दरम्यान सिहोरा गावात लघु पाठबंधारे विभागात कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी याच परिसरातील असल्याने कुणी या वसाहतीच्या खोल्यात वास्तव्य करीत नाही. ८-१० खोल्या उपयोगाविना पडून आहेत. या खोल्यात वीज, पाणी, शौचालय तथा अन्य सुविधा आहेत. या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कामकाजासाठी देण्याची विनंती आ. चरण वाघमारे यांना चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनेवाने, जेष्ठ शेतकरी गजानन निनावे, बालु तुरकर यांनी केले. कृषी आणि पाठबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने रिकाम्या खोल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगात आणण्यास हरकत नाही, असे चित्र स्पष्ट होताच आ.वाघमारे यांनी जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बोलनी केली. या खोल्यात महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय स्थानांतरीत करण्याची ओरड होत आहे. सध्या हे कार्यालय ग्रामीण सचिवालयात असल्याने सरपंच, सचिव, संग्राम कक्ष, सचिवाचा प्रशासकीय कारभार करण्यात अडचण होत आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालय पाठबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत गेल्यास शेतकऱ्यांना सोने पे सुहागा ठरणार आहे. एकाच व्यासपिठावर शेतकऱ्यांचे तीन विभाग उपलब्ध राहणार असल्याने राज्यातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. हे दोन्ही कार्यालय या वसाहतीत रिकाम्या खोल्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आ. वाघमारे यांचे समस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)