शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:10 IST

घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देसिरसोली प्रकरण : नाना पटोले यांचा प्रशासनाला अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडून महिना झाला आहे. तहसीलदार यांना घेराव, शिवलालच्या मुलांचे उपोषण, जनाक्रोश मोर्चा यांचा वापर केला गेला. तसेच तहसीलदार व सिरसोलीच्या सरपंचानी एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवलालला त्याच जागचा घरासाठी पट्टा मिळावा व अन्य मागण्यासाठी सत्ता पक्ष सोडून लढाई सुरु केली. तथापि, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासनाच्या जालीम उपायावर एक महिन्यापासून थोपवून ठेवले आहे.प्रशासन आश्वासनाचा अस्त्र वापरुन आंदोलनाची धार बोथड करण्याचा डाव खेळत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना घेराव घातले गेले. अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा सगळा प्रकार एका राजकीय नेत्याच्या सुपीक डोक्यातून झाल्याची जाहिर चर्चा होत आहे. तसेच सिरसोलीचे प्रकरण आश्वासनाच्या लांबणीवर टाकण्याचा कंट्रोल त्याच नेत्याच्या हातातून केला जातोय याची चर्चा अनेकजण करीत आहेत. विरोधकांनी शिवलालला हक्क मिळवून देण्यासाठी जनाक्रोश मोर्च्याची मजबूत मोट बांधली. पण प्रशासनाने पून्हा एकदा आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना निर्णयासाठी वेटिंगवर ठेवले आहे.या मोर्च्यात काँग्रेसचे राष्टÑीय नेते नाना पटोले यांची एंट्री महत्वाची मानली जाते. त्यांनी मोर्च्यात सहभाग घेतल्याने स्थानिक पुढाऱ्यांना शक्ती मिळाली. मोर्च्यात नाना पटोले यांनी तात्काळ निर्णय घेत नसाल तर मी रस्त्यावर येतो अशा इशारा देताच उपविभागीय अधिकारी हादरले. त्यांनी तात्काळ २९ जूनपर्यंत शिवलालला प्लॉट देण्याची कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले. पण इकडे आश्वासन देणारे अधिकारी किती खोटारडे आहेत असे संतापल्या सिरसोलीच्या महिलांनी नाना पटोले यांना सांगितले. नाना पटोलेनी, त्या महिलांना अवंतीबाई संबोधून, शब्द दिला, २९ तारीख प्रशासनाची पुढची तारीख नानांची असेल. जिल्ह्यात आंदोलन पेटवलं जाईल अशा जाहिर इशारा नाना पटोले यांनी प्रशानाला दिला आहे.आता शिवलालसह सगळ्या मोहाडीवासीयांचे लक्ष २९ जूनच्या तारखेकडे लागले आहे. प्रशासन आपले आश्वासन पूर्ण करेल काय, यावर आधीच शंका निर्माण होत आहेत. तरीही हे प्रकरण निस्तारायचे की वाढवायचे हे प्रशासनाच्या हाती आहे.