शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान पळविले

By admin | Updated: July 12, 2014 23:31 IST

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्राप्त अनुदान दोन जणांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्राप्त अनुदान दोन जणांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.माहितीनुसार तुमसर तालुक्यातील आंबागड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता बापूजी आदिवासी आश्रम शाळा कार्यान्वित आहे. या आश्रमशाळेला शासनाच्या आदिवासी विभागाकडून १०० टक्के अनुदान प्राप्त होतो. प्राप्त झालेला अनुदान निधी दोन जणांनी आपण संस्थेचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दर्शवून प्रकल्प कार्यालय भंडारा येथून पळवून नेले.या प्रकरणात ५ लक्ष ९५ हजार रुपयांचा धनादेश दोन्ही आरोपींनी खोटे दस्तावेज व खोटे शिक्के तयार करुन शासनाची दिशाभूल करुन पळवून नेले. ही आश्रमशाळा गंगाबाई शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित आहे.या संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव शेंडे रा. गोंदिया हे आहेत. परंतु खेमराज धोंडू कापगते रा. अंगुरबगिचा (गोंदिया) व राजू बालाजी सेलोकर रा.तुमसर यांनी बनावट दस्तावेज व शिक्के तयार करुन स्वत:ला संस्थेचे अध्यक्ष व सचिव दर्शविले. तसेच प्रकल्प कार्यालय भंडारा येथे येऊन शासकीय अनुदानाची अफरातफर करण्याच्या हेतूने ५ लक्ष ९५ हजार ३५४ रुपयांचे धनादेश पळवून घेतले.दि. १० जुलै २०१३ रोजी बनावट दस्तऐवजांच्या आधारे तुमसर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून खाता उघडून धनादेश वटवून घेतला. या आशयाची बाब संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव शेंडे यांच्या लक्षात येताच दि. १३ जुलै २०१३रोजी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ३२, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. कापगते व सेलोकर यांनी जामिनासाठी न्यायालयात २५ जून २०१४ रोजी अर्ज सादर केला असता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. दोघेही फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक अभय जाधव करीत आहेत. (स्घानिक प्रतिनिधी)