शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोने चोरट्यांची आंध्रातील टोळी सक्रिय

By admin | Updated: April 19, 2015 00:36 IST

मंगलमूर्ती सराफा दुकानासमोरून दुचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याची बॅग आंतरराज्यीय डिक्की टोळीने लंपास केल्याचा ...

प्रकरण सोने चोरीचे : केवळ सहा सेकंदात उघडली डिक्की तुमसर : मंगलमूर्ती सराफा दुकानासमोरून दुचाकीच्या डिक्कीतून ५०० ग्रॅम सोन्याची बॅग आंतरराज्यीय डिक्की टोळीने लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. टोळी आंध्रप्रदेशात सक्रीय आहे. कोकणातील पेन येथे डिक्कीतून सोने चोरी प्रकरण नुकतेच घडले. दोन्ही चोरीत साम्य दिसून येत आहे.११ एप्रिल रोजी मंगलमूर्ती ज्वेलर्स दुकानासमोर उभ्या दूचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी ५०० ग्रॅम सोन्याची दागीने असलेली बॅग लंपास केली. सराफा व्यवसायीक विवेक सोनी दुकानाचे शटर उघडत होते. केवळ सहा सेकंदात चोरट्यांनी हे कृत्य केले. प्रथम दुकान मालक विवेक सोनी संभ्रमात पडले. त्यांनी घरी आईशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर ते स्वत: घरी जावून सोन्याची बॅग घरी राहली असावी याची खातरजमा करण्यासाठी गेले. त्यानंतर बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पाहिले व पोलिसांशी संपर्क केला. सकाळी ११.१५ मिनिटांनी शहराची नाकेबंदी करण्यात आली. परंतु काही लागले नाही. दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केल्यावर डिक्कीचा लॉकमध्ये बदल दिसत आहे. डिक्की चाबीने उघडण्यात आली नाही तर येथे इतर साहित्याने उपयोग करण्यात आला आहे, अशी डिक्की केवळ सराईत चोरटेच उघडू शकतात. प्रथम शहर व परिसरातील संशयीतांची चौकशी येथे करण्यात आली. परंतू त्यातून काहीच शोध लागेल, असा सुगावा लागला नाही. कोकणातील पेनमध्ये डिक्कीतून सोने चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चोरट्यांनी तिथे वापरलेले साहित्यापासून संशय व्यक्त करण्यात येत आहे. आंध्रप्रदेश राज्यातील ही टोळी आहे. या टोळीचा हातखंडा मानला जातो. जिल्ह्यात अशी चोरी प्रथमच झाली आहे. या टोळीचा परस्पर संबंध तपासल्या जात आहे, अशी माहिती तुमसचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)