शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यानंतर सापडले आरोपी

By admin | Updated: August 4, 2015 00:25 IST

राष्ट्रीय महामार्गावरील गुंथारा फाट्यावरील नाल्यात १ मार्च रोजी दोन अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आले.

प्रकरण खुनाचे : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील गुंथारा फाट्यावरील नाल्यात १ मार्च रोजी दोन अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. या घटनेचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने मृतांची ओळख पटवून तब्बल पाच महिन्यानंतर ओरीसा राज्यातील संबलपूर येथून तीन आरोपींना अटक केली. १ मार्चला गुंथारा फाट्याजवळील नाल्यात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. स्थानिकांच्या माहितीवरून कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली. तत्कालीन ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांनी घटनास्थळी जावून तपास सुरु केला. मृतदेह महामार्गाने जाणाऱ्या एखाद्या वाहनाचे चालक वाहक असावे एवढाच एक अंदाज असल्याने पोलिसांचा तपास रेंगाळत होता. मृतांना ठार मारण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीतून सिद्ध झाले. यानंतर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. दरम्यान १३ मार्च रोजी घटनास्थळाच्या परिसरात महामार्गाच्या बाजूला ट्रक क्रमांक ओ.डी. १५ बी ३१८७ बेवारस स्थितीत आढळून आला. पोलिसांनी ट्रक मालकांचा शोध घेतला तेव्हा ओडीसा राज्यातील संबलपूर येथील ट्रांसपोर्ट कंपनीची माहिती मिळाली. कंपनीच्या मालकाने सदर ट्रकमधून संबलपूर वरून हिराकुंड येथे १८ टन अ‍ॅल्युमिनियम प्लेटची वाहतूक करण्यात आली होती. त्यानंतर मृतक हे दोघेही ट्रांसपोर्ट कंपनीत काम करणारे चालक भोला उर्फ सतरू बरिहा आणि वाहक पिंटू प्रल्हाद बेहरा असल्याची ओळख पटली. मृतांची ओळख पटल्यावर याच कंपनीत काम करणारा सुरेंद्र पाटीया यांच्यासोबत मृतक चालकाची ओळख होती व तो त्याला भेटला असल्याची माहिती पोलिसांनी मिळविली. त्यानुसार सुरेंद्र पाटीया याने सूरजकुमार बिस्वास, हरजंदर पड्डा यांच्यासोबत गडेगाव शिवारात चालक व वाहकाचा खून करून ट्रकसह माल पळवून नेला. असे कबुल केले. ट्रकमधील माल नागपुरच्या एका कंपनीत विकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. परंतु तो माल कुठे गेला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींना ३१ जुलैला अटक केली. त्यांना १३ आॅगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक दिलीप झलके, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धुसर, सहायक पोलिस निरीक्षक गेडेकर, गावंडे, हवालदार प्रीतीलाल रहांगडाले, सुधीर मडामे, राजेश गजभिये, सावन जाधव, दिनेंद्र आंबेडारे, स्नेहल गजभिये रमाकांत बोंद्र, बबन अतकरी यांनी तपासात सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)