शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यासाठी कृषी समर्पक धोरण स्वीकारा -बंडू बारापात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:53 IST

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....

ठळक मुद्देकृषी अर्थव्यवस्थेला बळकटीकरणाची गरजचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगीकारले पाहिजे, असे मत भंडारा येथील बिटीबी सब्जी मंडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू बारापात्रे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल, याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद....सिंचनाबाबत नेमके काय केले पाहिजे?तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्पांना इमाने इतबारे राबविण्याची गरज आहे. या प्रकल्पाने मोठ्यांसह लहान प्रकल्पातही पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊन कालव्यांच्या सहाय्याने व उपवितरीकांच्या मदतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. तसेच बोडी व तलावांचे खोलीकरण करून त्यातील पाणीही उपलब्ध करून दिले जाऊ शकते. शेततळे योजनेलाही प्राधान्य दिले गेले पाहिजे.स्वामीनाथन आयोगाबाबत आपले मत काय?सदर आयोग लागू करणे म्हणजे अन्नदात्याला खरा आधार देण्यासारखा आहे. मात्र या आयोगाच्या तरतुदी लागू करण्याबाबत नेहमी राजकारण केले जाते. तरतुदी लागू झाल्यास खऱ्या अर्थाने बळीराजाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. उत्पन्नाच्या आधारावर हमी भाव प्राप्त करून आर्थिक स्थैर्य तो प्राप्त करू शकतो. मागील तीन वर्षांपासून अडीच हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी निघाली नाही हा प्रश्नही मार्गी निघाला पाहिजे.विषमुक्त शेतीबाबत मत काय?आजघडीला शेतजमिनीचा पोत प्रदूषणाने ढासळत चालला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विषमुक्त शेती करिता नैसर्गिक पाणी जमिनीत मुरविणे अत्यंत गरजेचे आहे. सेंद्रीय खतांचा वापरही अगत्याने केला पाहिजे.जगाला पोसणारा अन्नदाता आत्महत्या करतो, ही बाब शासनाला आत्मचिंतन करण्यासाठी पुरेशी आहे. मात्र त्याकडे शासन, प्रशासन गंभीरतेने बघत नाही. हाडामासाचा जीव रक्ताचे पाणी करत असताना त्यांच्या वेदनांवर आर्थिक फुंकर घालणे महत्वाचे आहे.शाश्वत सिंचनाकरिता धरणातील पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचेल याची काळजी विद्यमान स्थितीत घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.