शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या अनुपस्थितीने स्थायी समितीत गदारोळ

By admin | Updated: July 15, 2016 00:42 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज गुरूवारला आयोजित करण्यात आली होती.

शिक्षक बदली प्रकरणावरून रणकंदन : वेळकाढू धोरणाचा पदाधिकाऱ्यांनी केला निषेध भंडारा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज गुरूवारला आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे अनुपस्थित राहिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. त्यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याने पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गदारोळ घातला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांचे नियोजन करण्यात येते. यासंदर्भात गुरूवारला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अध्यक्षांसह उपाध्यक्ष व सर्व समिती सभापती यांच्यासह सदस्य उपस्थित होते. दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह शिक्षणाधिकारी किसन शेंडे, वित्त अधिकारी यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर होते. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या प्रकरण गाजत आहे. बदल्या प्रकरणावर राज्य शासनाने स्थगिती दिली आहे, असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने बदली प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षकांची कार्यसेवा सध्या अधांतरी आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये जि.प. प्रशासनाविरूद्ध प्रचंड रोष आहे. या स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित करून शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर हेच अनुपस्थित असल्याने संतप्त पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जोपर्यंत सभागृहात येत नाही तोपर्यंत सभा सुरू करायची नाही, असा मुद्दा रेटून धरला. पदाधिकारी व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. या भितीमुळे कदाचित सीईओ सभागृहात न येता त्यांनी पळवाट काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदस्यांनी लावला. (शहर प्रतिनिधी)