शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या प्रतीक्षेत आटाेपली जिल्ह्यात 94 टक्के राेवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. मात्र गत महिन्याभरापासून पावसाचा जाेर कमी झाला. तुरळक सरी साेडता जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. दुसरीकडे नर्सरीतील पऱ्हे माेठे हाेऊ लागले. पाऊस नाही, राेवणी कशी करायची या चिंतेत शेतकऱ्यांनी उसणवार करीत शेतात सिंचनाची सुविधा केली आणि एकदाची राेवणी आटाेपली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरुवातीला दमदार काेसळलेल्या पावसाने दडी मारली ती आजतागायत. आज बरसेल, उद्या बरसेल या आशेवर पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात ९४ टक्के राेवणी आटाेपली. १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ५२ हजार ६७ हेक्टरवर राेवणी आटाेपली असून आता धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतशिवारात इंजीनचा आवाज घुमू लागला. सुरुवातीच्या पावसाने कागदाेपत्री पावसाची सरासरी कायम असली तरी वाढत्या तापमानाने धानपीक धाेक्यात येण्याची भीतीही कायम आहे.भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. मात्र गत महिन्याभरापासून पावसाचा जाेर कमी झाला. तुरळक सरी साेडता जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. दुसरीकडे नर्सरीतील पऱ्हे माेठे हाेऊ लागले. पाऊस नाही, राेवणी कशी करायची या चिंतेत शेतकऱ्यांनी उसणवार करीत शेतात सिंचनाची सुविधा केली आणि एकदाची राेवणी आटाेपली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५२ हजार ६७ म्हणजे ९४.१६ टक्के राेवणी आटाेपली आहे. त्यात सर्वाधिक राेवणी पवनी तालुक्यात १३७ टक्के म्हणजे २५ हजार २५३ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सर्वात कमी राेवणी माेहाडी तालुक्यात ७०.२ टक्के म्हणजे १९ हजार २२ हेक्टरवर करण्यात आली आहे.धान पिकाला माेठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. परंतु यावर्षी पाऊस कुठे काेसळताे आणि कुठे काेसळत नाही अशी अवस्था झाली आहे. संपूर्ण राज्यात जाेरदार पाऊस झाला असला तरी गत तीन आठवड्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. १ जून ते १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७९८.७ मिमी पाऊस काेसळताे. सध्या जिल्ह्यात ८३ टक्के पाऊस काेसळला आहे. एकीकडे राेवणी झाली परंतु पाऊस बरसत नाही. त्यामुळे अनेक काेरडवाहू शेतकऱ्यांनी इंजीन लावून आता सिंचन सुरू केले आहे. 

तूर १,२६७ हेक्टर तर साेयाबीन ७६० हेक्टरवर- जिल्ह्यात धान पिकासाेबतच तूर आणि साेयाबीनचे पीकही माेठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या बांधावर तुरीची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या नियाेजनानुसार १९४६ तूर क्षेत्र असून आतापर्यंत १,२६७ म्हणजे ६५.१३ टक्के लागवड झाली आहे. तर साेयाबीनच्या ६,५९१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ७६० हेक्टरवर म्हणजे ११.५३ टक्के लागवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती