शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

९२ गावांतील गोठ्यांचे नियोजन अडले

By admin | Updated: July 18, 2016 01:30 IST

जिल्हा परिषद पंचायत समिती व राज्य शासनाच्या वतीने सालेकसा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी

जनावरांची समस्या : २२ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा दरेकसा : जिल्हा परिषद पंचायत समिती व राज्य शासनाच्या वतीने सालेकसा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाकडून बैल, गाय, शेळी, म्हशी इतर पाळीव जनावरांच्या पशुसंवर्धनाकरीता गोठा तयार करण्यासाठी योजना कार्यान्वित आहे. पण पंचायत समिती सालेकसा अंतर्गत एकूण ४३ ग्रामपंचायत आहेत. ९२ गावात २२ हजार शेतकऱ्यांना गोठा द्यायचे होते. परंतु मागील एक वर्षापासून गोठा देण्यात आले नाही. शासन परिपत्रक २०१२ प्र.क्र.३६ रोहयो १ दि.९ आॅक्टोबर २०१२ नुसार शेतकऱ्यांना पाळीव जनावरांच्या संवर्धनाचे गोठे तयार करून देण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसभेत यादी मंजूर करून लाभार्थ्यांना योजनाचे लाभ देण्यात यावी, पण काही ग्रामपंचायतमध्ये सभेत यादी मंजूर करण्यात आली. काही ग्रामपंचायतमध्ये ही योजना कशासाठी आहे याची लोकांना जाणीवच नाही. गोठे तयार करताना शासनापरिपत्रकाद्वारे ४०/६० च्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त मातीचे काम झाले त्यांना १०० ते १५० गोठे मंजूर व्हावे, परंतु अधिकारी पदाधिकारी यांना जाणीवच नाही असल्याची बाब समोर येत आहे. ही योजना सन २०१२ पासून सुरू आहे. तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गोठे तयार करायचे होते. परंतु नियोजन न केल्यामुळे ही योजना कागदोपत्रीच राहीली. जि.प.चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या पत्रानुसार शेळी व गायीचे गोठे संवर्धनासाठी शेड मंजुरीचे मार्ग शासनाकडून मोकळे झाले आहेत. पण काही ग्रामपंचायतच्या सचिवांना व सदस्यांना याची कल्पना नसल्यामुळे लाभार्थी वंचीत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या हितायोग्य अनेक योजना कार्यान्वित करते. परंतु मांजर कुठे आडवी जाते माहीत नाही. परिणामी शेतकरी योजनेपासून वंचित आहे. तालुक्यात बऱ्याच ग्राम पंचायतींनी ग्रामसभेत गोठ्याचे नियोजन केले नाही. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत विषय घेऊन लाभार्थ्यांची यादी बनविली. लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत मंजूर झाली. परंतु यादी पुढील कार्यालयात पाठविण्यात न आल्याने पावसाळा सुरू होऊनही शेतकऱ्यांना गोठे मिळाले नाही. सर्व गोठ्यांची प्रकरणे त्वरीत सादर करून लाभार्थ्याना लवकर गोठे बांधकाम करून द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)