शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

८९ टक्के पेरणी खोळंबली

By admin | Updated: July 12, 2015 00:41 IST

पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली.

रोवणी केवळ ०.३१ टक्के : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटभंडारा : पहिल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने खरीप हंगामासाठी पऱ्हे व सोयाबीन तथा अन्य कडधान्याची पेरणी आटोपती घेतली. मात्र, त्यानंतर १५ दिवसापासून पावसाने दडी मारली. यामुळे अनेकांची पऱ्हे करण्याच्या मार्गावर तर पेरणीची बियाणे मातीत गडप झाली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट उभे राहिले. गुरूवारी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाच्या विलंबाने जिल्ह्यात रोवणी केवळ ०.३१ टक्के आटोपली असून पेरणी ११ टक्केच पार पडल्याचे वास्तव आहे.१ जून ते ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३१० मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. जूनच्या मध्यान्हापासून वरूणराजा गायब झाले. तत्पूर्वी पहिल्या पावसाच्या जोरदार आगमनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक पेरणी व आवत्या, रोवणी केली. मात्र, त्यानंतर सुमारे पंधरा दिवस पावसाने दडी मारली. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी रोवण्यांसह पेरणीही आटोपली. परंतू सिंचनाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान पाऊस नसल्याने पेरणी व रोवणी खोळंबली. जिल्ह्यात धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १,८१,५९१ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी भात नर्सरी १५,६९१.८० हेक्टर क्षेत्र, आवत्या ८,६८५ हेक्टर, रोवणी ५१६.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. भात पिकाची पेरणी ९,२०१.३० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आलेली आहे. सर्वसाधारण क्षेत्राचा विचार केल्यास जिल्ह्यात केवळ ५.०६७ टक्केच भात लागवड आटोपली असून सुमारे १,७२,३८.९७ हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ९४.९३३ टक्के क्षेत्रातील भात लागवड खोळंबली आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ०.३१ टक्के क्षेत्रात रोवणी झाली आहे. सोयाबीनसह अन्य कडधान्य पिकांसाठी कृषी विभागाने १,९८,६३९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले. त्यापैकी २२,३३०.२५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे केवळ ११.२४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.धान पिकाखेरीज जिल्ह्यात तूर, मुंग, उडीद हे कडधान्य, भुईमुंग, खरीप तीळ, सोयाबीन हे तेलबिया पीक, हळद, अद्रक, मिरची, भाजीपाला, ऊस आदी पिकांचीही लागवड जिल्ह्यात होते. धान पिकानंतर सोयाबीन व तुर पिकांची लागवडचे क्षेत्र आहे.भंडारा जिल्ह्यात तुर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८,२५० हेक्टर तर सोयाबीनचे ८,००६ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. यापैकी तूर ६,०७४ हेक्टरमध्ये तर सोयाबीन १,५९५ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आलेली आहे. तुर पिकाची २६.४ टक्के तर सोयाबीनची ८०.१ टक्के पेरणी अद्याप खोळंबली आहे. (शहर प्रतिनिधी)