शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही 84 हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

कोरोनाची पहिली लस उत्साहाने आणि रांगेत लागून घेतली. मात्र, दुसरी डोस घेण्यासाठी अनेकजण बेफिकीर दिसत आहेत. मुलांची परीक्षा, शेतीची कामे, सण-उत्सव अशी कारणे पुढे केली जात आहे. डोस घेण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ कंटाळा आणि बेफिकिरीच कारणीभूत आहे.

ज्ञानेश्वर मुंदे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  संभाव्य तिसरी लाट दारावर असताना जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार १४८ व्यक्तींनी मुदत संपूनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. कोरोना लाटेच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम अनुभवल्यानंतरही नागरिक बेफिकिरीने वागताना दिसत आहे.  जिल्ह्यात सहा लाख सात हजार ४२५ व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाख ७७ हजार ८८ आहे. पहिला डोस घेणाऱ्यांपैकी ८४ हजार १४८ व्यक्ती दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असतानाही लस घेतली नाही.

दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक - कोरोनापासून बचावासाठी लसीचा पहिला डोस घेतला म्हणजे सुरक्षित झाले असे नाही. लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. केवळ पहिला डोस घेऊन लसीकरणाकडे पाठ न करता लसीचा दुसरा डोस घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. दोन्ही डोस बचाव करू शकतात.

नेमकी अडचण काय ?

कोरोनाची पहिली लस उत्साहाने आणि रांगेत लागून घेतली. मात्र, दुसरी डोस घेण्यासाठी अनेकजण बेफिकीर दिसत आहेत. मुलांची परीक्षा, शेतीची कामे, सण-उत्सव अशी कारणे पुढे केली जात आहे. डोस घेण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ कंटाळा आणि बेफिकिरीच कारणीभूत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. काही लोक मुदतीमध्ये दुसरा डोस घेत नाहीत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ही बाब धोकादायक आहे. - डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या