शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

८९१ ज्योतिकलशांची स्थापना

By admin | Updated: April 11, 2016 00:33 IST

अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत मंदिरात चैत्र नवरात्रनिमित्त ८९१ मनोकामनापूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे. ...

अड्याळ येथील यात्रेला प्रारंभ : सर्वधर्मसमभावाची शिकवणविशाल रणदिवे अड्याळ अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत मंदिरात चैत्र नवरात्रनिमित्त ८९१ मनोकामनापूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे. या दर्शनासाठी व मंगलमय संगीतमय सुंदरकांड ऐकण्यासाठी सकाळ संध्याकाळी भाविकांची गर्दी होत आहे. श्रीरामनवमीपर्यंत देवीचे पूजन आणि नवरात्रीच्या व्रताचे विशेष महत्व असल्याने या मंदिरात गावातील व बाहेरील भक्तांचे आवागमन सुरुच असते.चैत्र नवरात्र हे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी व नंतर हनुमानजयंती पर्यंत अड्याळ येथे घोडायात्रा भरत असते. सर्व लोक या दिवसात चैत्र नवरात्र साजरा करतात. पार्वती मातेचा जन्म चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला झाला म्हणून या दिवशी नवरात्री साजरी केली जाते. दरवर्डी घोडायात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सतत या पंधरवाड्यात गर्दी असते. यामुळे बाहेर मार्गावर होणाऱ्या जड वाहतुकीकडे येथील ग्रामपंचायतीचे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या जड वाहनामुळे कित्येकदा भर चौकात मंदिरासमोरच वाहतूक कोंडी होते. यामुळेच मंगलकार्यात येणाऱ्या भाविकांना सुद्धा हा सततचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतीचे यावर त्वरीत उपाययोजना करणे महत्वाचे आहे. घरात घटपूजन केल्याने वास्तूदोष, आध्यात्मिक माहिती छत्तीसगड राज्यातील कोरबा येथील आचार्य विरेंद्र पाण्डेय महाराज यांनी दिली.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा घट विसर्जन तीन कि.मी. अंतरावर चकारा येथील महादेव देवस्थानच्या पायथ्याशी असणाऱ्या भव्य जलाशयात होणार आहे .यावेळी विशेष आकर्षण म्हणून नवरात्रातील नऊ रुपे दाखविण्यात येणार आहे. विसर्जनस्थळावर विद्युतची व दूरवरून पायी डोक्यावर कलश आणणाऱ्या व सोबत येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची, महाप्रसादाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती हनुमंत देवस्थानचे अध्यक्ष भाष्करराव पोटवार यांनी दिली.