शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे आठ कोटी थकीत

By admin | Updated: August 4, 2015 00:22 IST

धान आधारभूत केंद्राने शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी केली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही त्यांच्या धान्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही

लाखांदूर : धान आधारभूत केंद्राने शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी केली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही त्यांच्या धान्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. धान केंद्राकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ८ कोटीचे चुकारे अडल्याने खरीप हंगामात शेतकऱ्याला खासगी सावकाराच्या दारात उभे राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. धान उत्पादनात अग्रेसर लाखांदूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे शासनाकडे जवळपास ४ कोटी रुपये थकीत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बोनसनुसार २ कोटी असे ८ कोटी रुपये थकीत असल्याचे शेतकरी पुरता आर्थिक व्यवहारात अडकला आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील उन्हाळी धान उत्पादकांनी जवळपास ४९ हजार क्विंटल धानाची शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली. यासाठी वित्तीय संस्थांना धान खरेदीचे शासनस्तरावर अधिकारही देण्यात आले होते. ‘ब’ प्रतीच्या धानविक्री दाखल धान खरेदीनुसार जवळपास शासनाचे ४९ हजार क्विंटल धान खरेदी केली. यात विजयलक्ष्मी राईस मिल लाखांदूर, पंचशील राईस मिल मासळ, खरेदी विक्री सहकारी संस्था लाखांदूर यांनी अनेक गावात धान खरेदी केंद्र सुरु केले होते. सदर धानाची खरेदी दिघोरी, बारव्हा, लाखांदूर व पुयार, मासळ येथील केंद्रातून करण्यात आली. दरम्यान या केंद्रांतर्गत खरेदी पूर्ण धानाचे चुकारे खरीप हंगामाला सुरुवात होऊन दोन महिने लोटल्यानंतरही अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांचेकडे तक्रार केली. याची दखल घेत डोंगरे यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाचे चुकारे का मिळत नाही म्हणून जाब विचारला व आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवून दोषीवर कारवाईची मागणी केली.रब्बी धानाचे चुकारे नाही. यावर खरीप हंगामाला सुरुवात यामुळे पिक कर्ज घेवून शेती करणारा या भागातील शेतकरी पर्याप्त हमी भावाअभावी नागवला जात असताना शासनाला विकलेल्या मालाचे चुकारे निर्धारित वेळेत प्राप्त होत नसल्याने या भागातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. धानाचे चुकारे नाही. तरीपण शेतकऱ्यांनी पीक कर्ज व सेवा सहकारी संस्थामधून जुने कर्ज परतफेड करून नवीन खरीप हंगामासाठी खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावला आहे. व्याजाची रक्कम तथा न शेतकरी परंपरागत व्यवसाय करण्यासाठी धडपडताना दिसत आहे.यंदा अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे गेलेला शेतकरी मर्यादा संपल्यानंतरही कृत्रीम पाण्याने खरीप हंगामाची शेती करण्यालाही धडपडत घेताना दिसत आहे. हमी भाव तर सोळा, बोनस मिळणार नसून उशीरा का होईना दररोज आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाच्या चुकाऱ्यालाही पायपीट करावी लागत असल्याने आंदोलन करण्याचा इशाराही अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखांदूर तालुक्याची ३५ लाख रूपयांची लिमिट पूर्ण वाटप करण्यात आली. मात्र लाख रूपयांचे चुकाने अडून आहेत. शेतकऱ्यांची दररोज ओरड असते. याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना विचारले तर लवकरच चुकारे देण्यात येईल, असे सांगतात. मात्र चुकारे न दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.- आशिष बुरडे, व्यवस्थापक, विजया लक्ष्मी राईस मिल, लाखांदूर.