शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी राज्यात ५६ लाख ८७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे ...

भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील ३४ जिल्ह्यातील ५६ लाख ८७ हजार ४५७ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. ३२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला असून त्या पोटी २८३ काेटी रुपये भरण्यात आले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कांदा, तीळ पिकांचा विमा उतरवला आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे असल्यास नोंदणीच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी बँकेत स्वतःचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्यात सर्वाधिक लातूर विभागातील २५ लाख ४३ हजार २९४ शेतकऱ्यांनी १४ लाख ९८ हजार ४८५ हेक्टरसाठी तर औरंगाबाद विभागात १६ लाख ९३,६४२ शेतकऱ्यांनी ६ लाख ७९ हजार ४९८ हेक्टरसाठी विमा काढला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागात ७ लाख ७४४७ शेतकऱ्यांनी ६ लाख २० हजार ८२४ हेक्टरसाठी तर पुणे विभागात ३ लाख २४,३०२ शेतकऱ्यांनी २ लाख २० हजार ३६६ हेक्टर, नाशिक विभागात १ लाख ६५ हजार २७९ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ३४१ हेक्टर, नागपूर विभागातील ९८ हजार ८८९ शेतकऱ्यांनी ५९ हजार ५६५ हेक्टर, तर कोकण विभागात ७०, ७८५ शेतकऱ्यांनी २८ हजार ६८१ हेक्टर, तर सर्वाधिक कमी कोल्हापूर विभागात केवळ २० हजार ८१९ शेतकऱ्यांनी ११ हजार १२१ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. ही आकडेवारी १६ जुलैपर्यंतची आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २३ जुलै २०२१ पर्यंत वाढवल्याने राज्यातील हा आकडा आणखी आठ दिवसात वाढणार आहे. विमा हप्त्याची रक्कम ७६० रुपये प्रति हेक्‍टर असून विमासंरक्षण ३८ हजार रुपये प्रति हेक्‍टर आहे. सोयाबीन पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्‍टर ५५० रुपये असून विमा संरक्षण २७ हजार ५०० रुपये प्रति हेक्‍टर आहे.

बॉक्स

नागपूर विभागात भंडारा आघाडीवर

नागपूर विभागात खरीप हंगामातील पीक विमा योजनेत भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ४६ हजार ३९ शेतकऱ्यांनी २० हजार ६५५ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २१ हजार १० शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील १७ हजार ५८५ शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ९२५, नागपूरमधील ४ हजार ८०६ आणि वर्धा जिल्ह्यातील ३५२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.

कोट

भंडारा जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. शासनाने २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेत यापूर्वी सहभागी होता आले नाही, त्यांनी २३ जुलैपर्यंत पीकविमा योजनेचे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा.

‌- हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा