शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

५३६ सहकारी संस्था अवसायनात

By admin | Updated: January 1, 2015 22:57 IST

‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रिद वाक्य घेऊन सुरु असलेल्या जिल्ह्यातील ५३६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवासायनात निघाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र लयाला गेल्याचे चित्र आहे.

सहकार क्षेत्र लयाला : अनेक संस्थाची माहिती सादर करण्यास टाळाटाळमंगेश भांडेकर - चंद्रपूर‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रिद वाक्य घेऊन सुरु असलेल्या जिल्ह्यातील ५३६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवासायनात निघाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र लयाला गेल्याचे चित्र आहे. विविध कारणांमुळे या संस्था अवसायनात निघाल्या असून लवकरच या संस्थावर अंतिम कार्यवाही होणार आहे.जिल्ह्यात १ हजार ६८५ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अर्बन बँक, पतसंस्था व कर्मपत, विकास संस्था, गृहनिर्माण संस्था, मजूर संस्था, औद्योगिक संस्था व इतर संस्थाचा समावेश आहे. मात्र, ५३६ संस्थांनी आॅनलाईन ताळेबंद सादर न करणे, कर्जाची रक्कम अदा न करणे, नोंदी न ठेवणे, नियमित कामकाज न चालविणे, केवळ नोंदणी करुन कोणतेच काम न करणे अशा कारणांमुळे या संस्था अवसायनात निघाल्या आहेत. जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यात ३७४, मूल १०७, सावली ८९, नागभीड १५०, सिंदेवाही १०१, चिमूर ११७, वरोरा १४३, भद्रावती ९८, ब्रह्मपुरी १७२, बल्लारपूर ६४, राजुरा ८९, गोंडपिंपरी ६६, कोरपना ६३ व पोंभुर्णा तालुक्यात ५२ सहकारी संस्था आहेत. यात ५१ संस्थांचे कलम १८ अंतर्गत विलीनीकरण करण्यात आले आहे.सहकारी संस्थाना आॅनलाईन ताळेबंद सादर करण्यासाठी दोन ते तीन वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थानी याकडे दुर्लक्ष करुन आॅनलाईन ताळेबंद सादर केले नाही. अनेक संस्था जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडे माहिती सादर करीत नाही. त्यामुळे त्या संस्थेची केवळ नोंदणी कार्यालयात असते. संस्थेला वारंवार पत्रव्यवहार करून संस्थेची माहिती मागवावी लागत असते. हा प्रकार अनेक संस्थामध्ये सुरु असून संस्थेची नोंदणी करणे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेची कामे मिळवण्याचा गोरखधंदा सुरु आहे. सहकारी संस्थाच्या नावावर कर्ज काढून अनेकांनी आपली दिवाळी साजरी केली आहे. अशा दिवाळीखोरांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरु आहे.