शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:12 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो.

ठळक मुद्देविजयी मल्लांचा गौरव : केशव लेदे विजेता तर नामदेव शास्त्रकार उपविजेता

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसºया दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ५० मल्लांनी सहभाग नोंदविला. कुस्तीच्या थरारचा आनंद ग्रामीणांनी मनमुराद लुटला. यात केशव लेदे हे विजेता ठरले तर नामदेव शास्त्रकार उपविजेता ठरले.अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ हे गाव स्वातंत्र्य सैनिकाचे गाव आहे. या गावात जैराम दिघोरे, देवराव वाघधरे, ढेकल डहारे, दिवारु वाघधरे आदी पहेलवानांनी १९७६ पासून गावात आखाडा भरण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजतागायत जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षाला अहिल्यादेवी होळकर बाजार चौक येथे आखाड्याचे आयोजन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अतिथी म्हणून जयराम दिघोरे, दिवारू वाघधरे, देवराव वाघधरे, शंकर मांडवकार, रामकृष्ण वैरागडे, बिरशिराम भुरे, तुकेश वैरागडे, श्रीकृष्ण काटेखाये, वासुदेव लेंडे, यशवंत लोहकर, कलीम शेख, चिंकू सलूजा, सरपंच उषा काटेखाये, पं.स. सदस्य मंगला रामटेके आदी उपस्थित होते. या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला होता. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम अ‍ॅड. देवीदास वैरागडे व परसराम दिघोरे यांचेकडून देऊन गौरविण्यात आले. मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मागील ४० वर्षांपासून ही परंपरा कायम राखल्याने अनेकांना हे सांस्कृतिक पर्वणीच असल्याचे वाटते. प्रथम, द्वितीय मल्लांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले. जिल्ह्यातील मल्लप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. पंच म्हणून ईश्वर वैद्य, देवराव वाघधरे,बिरशीराम भुरे, जयराम दिघोरे यांनी केले. या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.जि.प. शाळेचे शिक्षक ठरले विजेताकुस्तीच्या दंगलमध्ये चिचाळ येथे ५० पट्टीच्या मल्लांनी सहभाग घेतला. यात चिचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या केशव लेदे यांनीही सहभाग घेतला. लेदे यांनी मुस्तीच्या आखाड्यात उतरल्यानंतर प्रथमत: ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, शिक्षक लेदे यांनी अनेकदा आखाडे गाजविले हे अनेकांनी माहित नव्हते. बघता बघता शिक्षक लेदे कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचले आणि शेवटचा आखाडा सुरू झाला. अंतिम सामन्यात लेदे यांच्याची झुंज नागपूर येथील नामदेव शास्त्रकार यांच्याशी होती. यात लेदे यांनी शास्त्रकार यांच्यावर लिलया मात करून कुस्तीचा आखाडा जिंकला.