शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार पटप्रेमींनी घेतला शंकरपटाचा आनंद

By admin | Updated: January 27, 2015 23:27 IST

येथील ऐतिहासिक स्वातंत्र्याची पार्श्वभूमी लाभलेल्या बैलांच्या शंकरपटाचे गणराज्य दिनापासून तीन दिवस आयोजन केले आहे. या शंकरपट प्रेमीनी आनंद लुटला. या शंकरपटात मोठ्या

गोसे (बुज.) : येथील ऐतिहासिक स्वातंत्र्याची पार्श्वभूमी लाभलेल्या बैलांच्या शंकरपटाचे गणराज्य दिनापासून तीन दिवस आयोजन केले आहे. या शंकरपट प्रेमीनी आनंद लुटला. या शंकरपटात मोठ्या संख्येने बैलजोड्या सोडण्यात आल्या. विजेत्या बैलजोड्यांना बक्षीसे देण्यात आले. शंकरपटाच्या आयोजनाचे हे ५८ वे वर्ष होते.येथे दरवर्षी गणराज्य दिनी २६ जानेवारीला शंकरपटाचे आयोजन करण्यात येते. येथील शंकरपट पूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. त्यामुळे दुरुन विदर्भातून हा शंकरपट पाहायला शंकरपटप्रेमी आले होते. येथील व परिसरातील गावातील प्रत्येक घर पाहूण्यांनी भरले होते. या दिवशी येथे सणासारखे वातावरण होते. येथील शंकरपटाला स्वातंत्र्याची पार्श्वभूमी असल्यामुळे या शंकरपटाने आपले वेगळेच महत्व राखले आहे. भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पूर्ण देशात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. गोसे (बुज) येथे हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी माजी सरपंच स्व. झिबल भगत यांच्या मार्गदर्शनात १९५८ ला या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्व. महादेव आवारी यांनी ही परंपरा सुरु ठेवली. ही परंपरा आजही सुरु आहे. मधल्या काळात शंकरपटाच्या जागेवर गोसीखुर्द धरणाची वसाहत होणार होती. पण येथील शंकरपट प्रेमी जनतेनी या वसाहतीला विरोध करुन वसाहत होवू दिली नाही.यावर्षी हा शंकरपट पाहण्याकरीता लांबून लोकांचे येणे सकाळपासूनच सुरु होते. दुपारपर्यंत ५० हजार पर्यंत शंकरपट प्रेमी जमा झाले होते. विधिवत पुजा करुन शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर एका मागून एक जोड्या सुटने सुरु झाले. पुर्ण शंकरपटाचे मैदान लोकांनी गर्दीने व्यापून टाकले होते. शंकरपट प्रेमी जनता धावणाऱ्या जोड्यांना आवाज देवून प्रोत्साहन देत होते. विजेत्या बैलजोड्यांना शंकरपट समिती ग्रामपंचायत तर्फे आकर्षक बक्षीसे देण्यात आले. शंकरपटात विविध प्रकारचे दुकाने शेतीची अवजारे, हॉटेल, मोठ्या प्रमाणात लागली होती. शंकर पटातील आकाशझुले तरुणी, तरुणी लहान मुलांचे आकर्षणाचे केदं्र होते. मेंढा पुनर्वसन येथे नाटकाचे तर गोसे (बुज) येथे खडी गमतचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)