शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

शहरात ५० फुटांची गुढी उभारणार

By admin | Updated: March 21, 2015 01:21 IST

श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे

पत्रपरिषद : उत्सवाला सहकार्याचे शोभायात्रा समितीचे आवाहन भंडारा : श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडावा. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.२१ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त शहरातील प्रमुख पाच चौकांमध्ये गुढी उभारली जाणार आहे. येथील गांधी चौकात ५० फुट उंचीची गुढी सकाळी ७ वाजता उभारल्यानंतर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येईल. त्या चौकांमध्ये रामायणावर आधारित पथनाट्य सादर करणार आहेत. संस्कार भारतीच्या वतीने १५० फूट लांब कॅनव्हासवर चित्र काढण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या चित्रांचे प्रदर्शन आगामी आठ दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. २२ रोजी बहिरंगेश्वर मंदिरातून लहान मुलांसाठी रामायणावर आधारित वेशभूषा स्पर्धा, २३ रोजी भजनसंध्या कार्यक्रम होईल. २४ रोजी श्रीगणेश शाळेत भजनसंध्येचा कार्यक्रम होईल. २५ ते २७ मार्च दरम्यान रात्री ८ वाजता वाल्मिकी रामायणावर आधारित रामकथा भागवताचार्य बा. ल. चोथवे सादर करणार आहेत. २७ मार्च रोजी सकाळी हृदयरोग व मेंदूच्या आजारांचे मोफत तपासणी शिबिर बहिरंगेश्वर मंदिरात घेतले जाईल. २८ मार्च रोजी राम जन्मोत्सव दुपारी १२ वाजता होईल. संध्याकाळी ६ वाजता श्रीरामाची शोभायात्रा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते रथाची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ होईल.या शोभायात्रेमध्ये सहभागी चित्ररथांची स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक चित्ररथांना बक्षिसे दिले जाणार आहेत. यावर्षीचा रामजन्मोत्सव वैविध्यपूर्ण व्हावा आणि पार पडावा, अशी अपेक्षाही समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केली. यावेळी समितीचे सचिव बाळा आंबेकर, सतीश सार्वे व धनंजय ढगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)