शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावांची काळजी घेणारे रुग्णालय आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तालुक्यातील ४७ गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले सिहोरा ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तुटवडा : सिहोरा ग्रामीण रुग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील ४७ गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले सिहोरा ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. जणू ग्रामीण आरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.तुमसर तालुक्यात सिहोरा परिसर सर्वात मोठा आहे. ४७ गावे ग्रामीण रुग्णालयांतर्गत येतात. ७ वर्षांपुर्वी सुमारे दीड कोटींचे बांधकाम करुन ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली. रुग्णालय परिसरातच वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधण्यात आले. शासनाने वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पदाला मान्यता दिली. पंरतू नियमित वैद्यकिय अधिकाऱ्यांची अद्याप नियुक्तीच केली नाही. प्रभारी वैद्यकिय अधिकारी येथे सेवा देत आहेत. डॉ. अविनाश खुणे कामाचा ताण सहन करत रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते मुख्यालयी २४ तास राहून आपली सेवा देतात. उत्तम डॉक्टर म्हणून रुग्णात परिचीत झाले आहेत. परंतु अलीकडेच त्यांची बदली झाल्याची माहिती आहे. पर्यायी वैद्यकिय अधिकारी येथे उपलब्ध नसल्याने डॉ. खुणे येथेच थांबल्याचे सांगण्यात आले.येथील ग्रामीण रुग्णालयात परिचारीकांची संख्या कमी आहे. उपलब्ध परिचारिका अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पद मंजूर करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, हिरालाल नागपूरे, राजु ढबाले यांनी केली आहे. मात्र सध्या स्थितीत पुरेशी यंत्रणा नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या परिसरात शेतकरी शेतमजुरांची संख्या अधिक आहे. आजारावर उपचारासाठी शहरात जाणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथील रुग्णालयाचाच आधार असतो. परंतु येथे पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने तात्पुरता इलाज करून शेवटी भंडाºयाला जाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य विभागाने सिहोरा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी आहे.शवविच्छेदन गृह नावापुरतेसिहोरा ग्रामीण रुग्णालयात शासनाने लाखो रुपये खर्च करुन शवविच्छेदन गृह उभारले आहे. पंरतु आतापर्यंत शवविच्छेदनच झाले नाही. कुणाचा अपघाती मृत्यू झाल्यास मृतदेह घेऊन तुमसर येथे जावे लागते. त्याचा मनस्ताप रुग्णांना सहन करावा लागतो.