शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

३७४ कोटींचा प्रकल्प पोहोचला १८ हजार कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

भंडारा : विदर्भातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील गोसी खुर्द प्रकल्पाला आता पूर्णत्वास नेण्यासाठी १८ हजार कोटींची ...

भंडारा : विदर्भातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील गोसी खुर्द प्रकल्पाला आता पूर्णत्वास नेण्यासाठी १८ हजार कोटींची गरज आहे. सुरुवातीला ३७४ कोटी रुपयांच्या भूमिपूजनपासून सुरुवात झालेला हा प्रकल्प हजारो कोटींपर्यंत पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना हव्या त्याप्रमाणे सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली नाही.

भंडारा जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगासह तिच्या तीन उपनद्याही आहेत. याच आधारावर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थेअंतर्गत प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ चार दशकांपूर्वी रोवण्यात आली. मात्र चार दशकानंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. अजूनही पुनर्वसनाची कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. जमीन, घरांचा मोबदलाही अनेकांना मिळायचा आहे.

बॉक्स

भीमलकसा प्रकल्प

साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला भीमलकसा प्रकल्प तीन दशकांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. हा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास साकोली व अन्य तालुका लागलेल्या परिसरातही या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. मात्र हाही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही, हीच साकोली तालुक्‍याची खरी शोकांतिका आहे.

बॉक्स

निम्न चूलबंद प्रकल्प

साकोली तालुक्यातील महत्त्वकांक्षी दुसरा प्रकल्प म्हणजे निम्न चूलबंद प्रकल्प. चूलबंद नदीवर आधारलेला हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. लहानमोठी कामे अजूनही रखडलेली आहे. अपूर्णत्व कामामुळे शेतकऱ्यांना सिंचन घेण्यास अडचण निर्माण होत आहे. हा प्रकल्पही निधी वाढल्यामुळे रखडलेला आहे.

बॉक्स

करचखेडा उपसा सिंचन

भंडारा तालुकांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या करचखेडा सिंचन प्रकल्पही अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे व अन्य तांत्रिक कामे रखडलेली आहेत. या प्रकल्पालाही निधीचा फटका बसला असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी होत आहे.

बॉक्स

अन्य प्रकल्पांची दुरवस्था

भंडारा जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प निधीअभावी तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांनी रखडले आहेत. यात बावनथडी प्रकल्प, काळा गोटा प्रकल्प, नेरला उपसा सिंचन योजना यासह अनेक प्रकल्प थंडबस्त्यात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी कालवे व त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकलेला नाही. यावर निर्णय होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

कोट बॉक्स

राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आम्हाला सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

शरद भुते, शेतकरी खुटसावरी

कोट बॉक्स

साकोली तालुक्यातील निम्न चूलबंद प्रकल्प पूर्णत्वास गेला असता तर आज खऱ्या अर्थाने त्याचा लाभ झाला असता. मात्र हा प्रकल्पही पूर्ण होऊ शकला नाही.

यादोराव नंदेश्वर, शेतकरी, पिंडकेपार

कोट बॉक्स

टप्प्याटप्प्याने का होईना शासनाने प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा. मात्र अनुदानाची रक्कम मिळायला वर्ष-वर्ष लागत असतील तर सिंचन प्रकल्पासाठी निधी कुठून येणार.

प्रभू साखरे, शेतकरी दवडीपार बा.