शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार ४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

By admin | Updated: January 22, 2015 00:35 IST

जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८ याप्रमाणे एकूण १५४ गावांना राज्य शासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे.

देवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एक, मोहाडी तालुक्यातील २४, तुमसर ९, पवनी ४८, लाखांदूर ३४, लाखनी ३८ याप्रमाणे एकूण १५४ गावांना राज्य शासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे १५४ गावांतील ३२ हजार ९९२ अल्पभूधारक आणि ३ हजार ५५ असे एकूण ३६,०४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत मिळणार आहे. धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केलीे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ६९३ गावांची ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आलीे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या १८.९० कोटी निधीपैकी ८.९ कोटी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलीे. जिल्हा प्रशासनाने सहा तालुक्यात ८.९ कोटी रुपयांचा निधी तहसिलदारांना वितरीत केला आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या दोन लक्षच्या घरात असली तरी नुकसान भरपाईचा लाभ टंचाईग्रस्त १५४ गावांतील ३२ हजार ९९२ अल्पभूधारक आणि ३ हजार ५५ असे एकूण ३६,०४७ शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत मिळणार आहे. यात भंडारा तालुक्यातील ३५७, पवनी ८,०२९, तुमसर १,६३४, मोहाडी ७,४९२, लाखांदूर ९,३९०, तर लाखनी तालुक्यातील ९,१४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावी परिक्षेचे शुल्क माफ, रोहयो अंतर्गत निकषात शिथीलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टँकरने पुरविणे, कृषीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत.सध्या तालुकास्तरावर प्रशासनातर्फे ज्यांनी आतापर्यंत बँकेचे खाते उघडले नाही, त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत करून त्यांना जनधन योजनेअंतर्गत खाते उघडण्याचे आव्हान करीत आहेत.