शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या चुकाऱ्याचे ३३ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:03 IST

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या उन्हाळी हंगामातील तब्बल २ लाख क्विंटल धानाचे सुमारे ३३ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावार शेतकऱ्यांना पैशाची निकट आहे. मात्र चुकाने मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देउन्हाळी धान : आधारभूत केंद्रावर २ लाख क्विंटल धान विक्री

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या उन्हाळी हंगामातील तब्बल २ लाख क्विंटल धानाचे सुमारे ३३ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावार शेतकऱ्यांना पैशाची निकट आहे. मात्र चुकाने मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.भंडारा धान उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सिंचनाच्या सोईमुळे येथील शेतकरी उन्हाळी धानपिक मोठ्या प्रमाणात घेतात. यावर्षी उन्हाळी हंगामात आतापर्यंत सुमारे २ लाख क्विंटल धान शेतकºयांनी शासकीय आधारभूत केंद्रावर विकला आहे. नियमानुसार त्यांना किमान आठ ते दहा दिवसात चुकारे मिळणे गरजेचे होते. परंतु शासनाकडून धानाचे पैसेच आले नाही. सुमारे ३३ कोटी रुपये चुकाºयाचे थकीत आहेत. शेतकºयांना आतापर्यंत एकही दमडी मिळाली नाही. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. शेतकºयांनी मशागतीची कामे सुरु केली आहे. धानाचे बीज खरेदी करणे तसेच इतर कामाकरिता शेतकºयांकडे पैसे नाही. सध्या आॅनलाईनचा काळ सुरु आहे तरी विलंब होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. धानाचे चुकारे अडल्याने खरीपातील धान पेरणीसाठी शेतकºयांना कर्ज काढावे लागत आहे. अनेक शेतकºयांना तर व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतकºयांचा तात्काळ पैसा द्यावा अशी मागणी आहे. रबी हंगामात धानाचा उतारा आला नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकाची शेतकºयांनी लागवड केली. शासनाने चुकारे थकीत ठेवले आहेत. त्या शेतकºयांना ताबडतोब चुकारे मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे. आता शेतकºयांना त्यांच्या घामाचे दाम कधी मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागतले आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन लाख क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली आहे. गुरुवारी शासनाकडून साडेचार कोटी प्राप्त झाले आहेत. गुरुवारी शासनाकडून साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. लवकरच धानाचे चुकारे शेतकºयांना करण्यात येतील. उर्वरित रक्कम शासनाकडून मिळणार आहे.-गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा

टॅग्स :agricultureशेती