शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ६८ कोटींचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:09 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

ठळक मुद्देएक लाख ६३ हजार शेतकरी : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, कमी रोवणी झालेल्या क्षेत्राचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पंतप्रधान पीक विमा योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शेतकरी प्रतिनिधी व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शासन निर्णयाप्रमाणे जोखिमेबाबत प्रातिनिधीक सुचकांच्या आधारे अधिसूचित विमा क्षेत्र व पीक निहाय सरासरी क्षेत्र याबाबतची जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली. जिल्ह्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे सरासरी २५ टक्क्याच्यावर रोवणी झाले नसल्याचे या बैठकीत एकमताने ठरले.यावर सासरी पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर रोवणी होवू न शकलेले अधिसूचित विमा क्षेत्र घटक नुकसान भरपाईस पात्र राहिले, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याअनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विमा लाभास पात्र आहे. कर्जदार सभासद एक लाख ३७ हजार ६२४, क्षेत्र ६० हजार ८१३ हेक्टर, बिगर कर्जदार सभासद २५ हजार ४५०, क्षेत्र १४ हजार ४३७ असे एकूण एक लाख ६३ हजार ७४ सभासद, ७५ हजार ४४० हेक्टर विमाक्षेत्र असणारा या सभासदांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.दहा वर्षात पहिल्यांदाच अशी अवस्थाकृषी विभागाच्या अहवालानुसार गत दहा वर्षात रोवणीची स्थिती पहिल्यांदाच झाली आहे. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोवण्या होऊ शकल्या नाही. त्यांना आता पीक विम्याची मदत मिळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा