शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

भारनियमनाचा कहर २५ गावे अंधारात

By admin | Updated: May 25, 2014 23:20 IST

महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु केले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत

भंडारा : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु केले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत भारनियमनाची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या भारनियमन मुक्तीचा फज्जा उडाला आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून जिल्हावासीयांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात १८ ते २0 तास भारनियमन केले जात असल्याने नागरिक भर उन्हाळ्यात होरपळून निघत आहे. धारगाव फिडर अंतर्गत येणारी २५ गांवे दोन दिवस अंधारात होती.

शहरी विभागासोबत ग्रामीण विभागामध्ये भारनियमनाचा तडाखा सुरु आहे. मात्र भारनियमनाच्या वेळा कंपनीने ठरवून दिलेल्या नाहीत. तसे वेळापत्रक नागरिकांसाठी प्रसिध्द करण्यात आलेले नाही. परीणामी भारनियमन नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. धारगाव फिडरअंतर्गत एमआयडीसी राजेगाव, खुटसावरी, पिंपळगाव, माडगी, टेकेपार, खुर्शिपार, वाघबोडी, धारगाव, गुंथारा, डव्वा, आमगाव/दिघोरी, पलाडी, सिंगोरी आदी २५ गावांचा समावेश आहे.

उन्हाचा तडाखा सुरु झाला असून तापमान ४५.0५ अंश सेल्सीअसपर्यंत पोहचला आहे. या उष्णतेसोबतच भारनियमनात वाढ झाल्याने त्याचा फटका ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांना सोसावा लागत आहे. एकीकडे पाणी टंचाई उग्र रुप धारण करीत आहे.

जिल्हा टँकरमुक्त असल्याचा गाजावाजा जिल्हा प्रशासन करीत असले तरी या वर्षीच्या तापमानाची दाहकता बघता पाण्यासाठी टँकरचा उपयोग करावा लागणार असल्याचे चित्र आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दररोज खोल जात असल्याने गावातील विहीर, बोअरवेल आटू लागल्या आहेत.

त्यातच मे व जून हे दोन महिने भीषण उष्णतेचे असतात. तेव्हा दररोज वाढत जाणारा भारनियमन व ग्रामीण नागरिकांसाठी अतिसंकटमय होत चालला आहे. शहरी भागापेक्षा ग्रमीण भागात भारनिमनाचा फटका अधिक सोसावा लागत आहे. भारनियमनाची झळ अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसात भारनियमन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकिय षडयंत्राचा आरोप

राज्यशासनाने भारनियमन मुक्त राज्य असा आदेश काढला होता. तेव्हापासून जिल्हयात भारनियमन केले जात नव्हते.

परंतु अचानक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिवघेणे भारनियमन सुरु करण्यात आले. याचा फटका अनेकांना बसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भारनियमन करणे हे राजकिय षडयंत्र असल्याचा आरोप गांवागावामध्ये चर्चीला जात आहे. (नगर प्रतिनिधी)