शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

५६ हजार शेतकऱ्यांना २४३ कोटींचे पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:40 IST

शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देसुनील फुंडे : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आमसभा, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा येथील लक्ष्मी सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमसभेला आमदार चरण वाघमारे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक कैलास नशिने, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तितीरमारे, अंजिराबाई चुटे, कवलजिंतसिंह चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती धनेंद्र तुरकर, आनंदराव वंजारी, तुमसर बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे उपस्थित होते.सुनील फुंडे म्हणाले, २००५-०६ पासून जिल्हा बँक निव्वळ नफ्यात आहे. चालू वर्षात बँकेला १०.२८ कोटी रूपयांचा नफा झाला असून २.०४ लाख निव्वळ नफा आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर येथे शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एटीएम, नेट बँकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेती क्षेत्र जास्तीत जास्त ओलीताखाली आणण्यासाठी कर्ज पुरवठा करणे सुरू आहे. प्रधानमंत्री मुद्रालोन, सोनेतारण, पगार तारण, पेंन्शन तारण आदी कर्जाची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.२०१५-१६ व २०१६-१७ चे केंद्र शासनाकडून ५७०.४४ लाख रूपये व्याजाची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. २०१७-१८ चा व्याज प्रस्ताव संस्थांकडून बँकेला प्राप्त झाला नाही. २००७-२००८ ते २०१६-१७ पर्यंत मार्केटिंग फेडरेशनकडून खड्या हुंड्यावरील एकूण ५६१.१० लाख मिळाले नाही. यामुळे शासनाचा योजना राबविताना बँकेने हित कसे सांभाळावे हा प्रश्न संचालक मंडळापुढे येत असल्याची खंत सुनील फुंडे यांनी व्यक्त केली. कर्मचाºयांनी ग्राहकांना वेळेवर उत्तम सेवा द्यावी, असा दमही या आमसभेत भरला. या आमसभेत विविध ठराव पारित करण्यात आले.११०० कोटींचा ठेवीची अपेक्षाभंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २००६ मध्ये विभाजन झाले. त्यावेळी एकूण भाग भांडवल १०.४१ कोटी व २६३.१७ कोटी ठेवी होत्या. मात्र आमसभेशी संबंधीत वर्षाअखेर बँकेत एकूण भाग भांडवल ३६.७० कोटी व एकूण ठेवी ९८६.५८ कोटी आहे. पुढील वर्षी किमान ११०० कोटी रूपयांचा ठेवी बँकेत असतील अशी अपेक्षा फुंडे यांनी व्यक्त केली.