शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:24 IST

भंडारा : भरडाईच्या वाढीव दरासाठी सुरू असलेला शासन आणि मिलर्समधील तिढा अद्यापही कायम असून, आतापर्यंत खरेदी झालेले २२ लाख ...

भंडारा : भरडाईच्या वाढीव दरासाठी सुरू असलेला शासन आणि मिलर्समधील तिढा अद्यापही कायम असून, आतापर्यंत खरेदी झालेले २२ लाख ६९ हजार ४३९ क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक केंद्रांवर धान उघड्यावर आहे. अवकाळी पावसाचा फटका उघड्यावरील धानाला बसत असून, शेकडो क्विंटल धान ओले होत आहे.

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदीला सुरूवात झाली. जिल्ह्यात सध्या १३४ केंद्रांवर धान खरेदी सुरू आहे. आतापर्यंत २२ लाख ६९ हजार ४३९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एक क्विंटलही धान मिलर्सनी भरडाईसाठी उचललेले नाही. धान भरडाईचे दर वाढवून द्यावे, या मागणीसाठी गत महिनाभरापासून त्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धान गोदाम हाऊसफुल्ल झाली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील गोदामांची क्षमता आठ लाख क्विंटल आहे. उर्वरित संपूर्ण धान उघड्यावर आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर धान पोत्याच्या थप्प्या उघड्यावर असल्याचे चित्र आहे. मिलर्स आणि शासन यांच्यात आतापर्यंत तीन ते चारवेळा चर्चा झाली. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे धान सद्यस्थितीत उघड्यावर आहे.

मंगळवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने उघड्यावरील धान ओले झाले आहे. विशेष म्हणजे केंद्रावर असलेल्या धानाची संपूर्ण जबाबदारी खरेदी करणाऱ्या संस्थेची असते. संस्थेसोबत विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे धानही ओले झाले. वातावरणात बदल होताच अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राकडे धाव घेऊन धान पोती झाकण्याचा प्रयत्न केला तर संस्थांनी आपल्याकडील त्रिपाल झाकून धान पोत्याचे पावसापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठ्या प्रमाणात असलेले धान त्रिपालने झाकणे शक्य होत नाही. परिणामी अनेक केंद्रांवरील धानाला पावसाचा फटका बसला आहे.

बॉक्स

तिढा लवकर सुटण्याची चिन्हे

धान भरडाईवरून निर्माण झालेला तिढा लवकर सुटण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी यासंदर्भात मुंबई येथे बैठक झाल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत नेमके काय झाले, हे कळू शकले नाही. परंतु, लवकरच भरडाईचा तिढा सुटेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

बॉक्स

सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात झाली आहे. येथील २१ केंद्रांवर १६ फेब्रुवारीपर्यंत पाच लाख ९ हजार ४७५ क्विंटल खरेदी झाली आहे. त्या खालोखाल तुमसर तालुक्यातील २५ केंद्रांवर चार लाख ५८ हजार ३१७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. भंडारा तालुक्यातील १७ केंद्रांवर एक लाख ७९ हजार ४४८ क्विंटल, मोहाडी तालुक्यातील २२ केंद्रांवर तीन लाख २४ हजार ७० क्विंटल, लाखनी तालुक्यातील १४ केंद्रांवर दोन लाख ९५ हजार ४२८ क्विंटल, साकोली तालुक्यातील १८ केंद्रांवर तीन लाख पाच हजार ८४० क्विंटल आणि पवनी तालुक्यातील १७ केंद्रांवर एक लाख ९६ हजार ८९८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.