शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १७५.६१ कोटींची अतिरिक्त मागणी

By admin | Updated: March 7, 2017 00:28 IST

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय ...

विभागीय आयुक्तांकडे बैठक : निधी उपलबध करुन देण्याचे अर्थमंत्र्याचे आश्वासनभंडारा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठकीमध्ये सन २०१७-१८ करिता भंडारा जिल्ह्यासाठी १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली. सदर मागणीबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ.परिणय फुके, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, साकोलीचे आमदार बाळा काशीकर, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड तसेच प्रमुख यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी ७९ कोटी ४० लक्ष रूपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विविध यंत्रणांकडून १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रूपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रूपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात येत असल्याचे सांगितले.अतिरिक्त निधी वने व वन्यजीव, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, सामान्य शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगर विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, परिवहन आदी कामासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील चारही आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी केली.यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, भंडारा जिल्ह्यातून आलेली अतिरिक्त निधीची मागणी मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. जिल्हास्तरावर रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा बनविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नागपूर विभागातील मामा तलावासाठी मागील वर्षी १५० कोटी रुपये देण्यात आले. मात्र ती कामे वेगाने पूर्ण झाली नाही असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, मामा तलावाचे नूतणीकरण करताना मत्स्य संवर्धन हा मुख्य घटक माणण्यात यावा. मानव विकास मिशन अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या तालुक्याची आरोग्य शिक्षण व रोजगार या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. यासाठी लागणारा निधीचा आराखडा एप्रिलमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले. (नगर प्रतिनिधी)