शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: August 13, 2014 23:38 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

संजय साठवणे - साकोली नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने १७ पैकी नऊ प्रकरणे अपात्र ठरविली असून सात प्रकरणे प्रलंबित ठरविण्यात आलेली आहेत. मागीलवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रोवणी अजूनही शिल्लक आहेत. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज घेतले आहे. मात्र यावर्षीच्या पिकाची हमी नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. साकोली तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नाही. १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कुमोद कांबळे (४५) रा.धर्मापुरी (साकोली), यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. दर्याव बिसने (६५) केसलवाडा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नामदेव पचारे (५०) रा.लाखनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम दोनोडे (४२), परसटोला (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत झिंगरे (३२) रा.पालांदूर (लाखनी) पाण्यात मृतावस्थेत आढळून आले. महादेव पराते (३८) रा.उमरझरी (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दयाराम कोळे (४५) रा.पळसगाव (साकोली) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यशवंत मेश्राम (५२) रा.खेडेपार (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. माधोराव लांजेवार (६८) रा.निलागोंदी (लाखनी) यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. राजेंद्र विठोले (४०) रा.तामसवाडी (तुमसर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. रमेश रहांगडाले (३६) रा.एकोडी (किन्ही) साकोली हे मृतावस्थेत आढळून आले. हरिहर गहेरवार (३५) रा. मेंढा (लाखनी) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सीताराम भागडकर (५५) रा.करांडला हे शेतात मृतावस्थेत आढळून आले. रामचंद्र चौधरी (६७) रा.लाखांदूर हे मृतावस्थेत आढळून आले. ज्ञानेश्वर मिसार (४०) रा.डोकेसरांडी (लाखांदूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिसन गिरीपुंजे (६५) रा.किन्ही (साकोली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बळीराम उईके (७७) रा.पवनारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद आहे. यात साकोली व लाखनी तालुक्यातील सर्वाधिक आहेत.मृतकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत यशवंत मेश्राम रा.खेडेपार या एकाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे प्रकरण पात्र ठरले. ७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.