शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेती प्रकरणी १.६६ लाखांचा दंड

By admin | Updated: April 18, 2017 00:35 IST

रेती चोरण्याच्या उद्देशाने रेतीघाटावर जमा झालेल्या १६ ट्रॅक्टरवर सुटीच्या दिवशी १४ एप्रिलच्या मध्यरात्री....

तहसीलदारांची कारवाई : प्रकरण मोहाडी तालुक्यातीलमोहाडी : रेती चोरण्याच्या उद्देशाने रेतीघाटावर जमा झालेल्या १६ ट्रॅक्टरवर सुटीच्या दिवशी १४ एप्रिलच्या मध्यरात्री तहसीलदार धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून ते ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले होते. ट्रॅक्टर रिकामे आढळल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करावी याचे वरिष्ठाकडून मार्गदर्शन घेतल्यावर प्रति ट्रॅक्टर १० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने ट्रॅक्टर मालकांचे धाबे दणाणले आहे.गुप्त माहितीच्या आधारे मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी नायब तहसीलदार डॉ.गौरीशंकर चव्हाण, नायब तहसीलदार राहुल वाघ, लिपीक एकनाथ कातखेडे तसेच पोलीस निरीक्षक प्रदिपसिंह परदेशी, पोलीस नायक आशिष तिवाडे, होमगार्ड यशवंत ठवकर, दिपक ठवकर, रवी पाटील, सेलोकर यांच्या पथकाच्या सहाय्याने बेटाळा घाटावरील किनाऱ्यावर १६ ट्रॅक्टर रिकाम्या स्थितीत उभे असलेले आढळले. रात्रीच्या वेळी घाटावर ट्रॅक्टर उभे असल्याने संशयाच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र या सर्व ट्रॅक्टरचे चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. खासगी चालक बोलावून हे सर्व ट्रॅक्टर मोहाडी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. अजून पर्यंत या ट्रॅक्टरचे मालक तहसील कार्यालयात आलेले नाहीत. बेटाळा येथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर दोन घाट आहेत. यापैकी एका रेती घाटाचा लिलाव झालेला असून दुसऱ्या रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ज्या रेतीघाटाचा लिलाव झालेला आहे तेथून मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने त्या रेती घाटावर पुरेशी रेती नसल्याने लिलाव झाला नसलेल्या रेतीघाटाची रेती लिलाव झालेल्या घाटात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणली जाते अशी चर्चा आहे. या घटावरून त्या घाटात रेती सोडण्याची कारवाई संपूर्ण रात्रभर चालते. विशेष करून शासकीय सुटीच्या रात्रीच्या ४० ते ५० ट्रॅक्टर लावून कार्य केले जाते. अशी माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)टिप्परवर १ लक्ष चार हजारांचा दंडमोहाडी तालुक्यातून रेती चोरण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. रविवारच्या रात्री सातोना रस्त्यावरून विनापरवाना रेती वाहून नेणाऱ्या दोन टिप्पर ट्रकना जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. टिप्पर क्र.एम.एच. ३६ एफ ३४६२ हा रमेश डोळस वरठी यांच्या मालकीचा तर एम.एच. ४० एन ०९६५ हा टिप्पर ट्रक राजेश साठवणे यांच्या मालकीचा आहे. प्रत्येक टिप्परवर ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दोन्ही ट्रकवर एकुण १ लक्ष ४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पहाटे रेती चोरीवैनगंगा नदीपात्रातून पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून वाहतूक केली जाते. पहाटेला रोहा, बेटाळा घाटातून कुशारी मार्गे डोंगरगाव, आंधळगाव मार्गे दहा ते १५ ट्रॅक्टर दररोज रेती वाहून नेत असल्याची विश्वासनीय माहिती आहे. मात्र या रेती माफीयावर अजूनपर्यंत तरी कारवाई करण्यात आलेली नाही. यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जाते.शासकीय सुटीच्या दिवशी तसेच रात्रीला रेती चोरी होते अशी माहिती मिळाल्याने रेती चोरावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात येऊन लक्षावधी रुपयाचा महसूल प्राप्त झाला.-धनंजय देशमुख,तहसीलदार, मोहाडी.