शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांपासून नळ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असून गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष ...

ठळक मुद्देपरसवाडा येथील प्रकार : शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असून गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावात नळ योजनेसाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली. परंतु अद्यापही येथे नळ योजना सुरू झाली नाही.यासाठी लोकप्रतिनिधींना अनेकदा भेटून निवेदने देण्यात आली. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन ६ ते ७ महिन्यापूर्वी गावात नळयोजनेच काम करण्यात आले होते. आजही महिला २ किलोमीटर अंतराहून पिण्याचे पाणी डोक्यावर गुंड घेऊन आणतात. यात अनेक वृद्ध महिलांना आजारपणामुळे पाणी आणायला जमत नसल्याने त्यांना पाण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो.परसवाडा ग्रामस्थांना क्षारयुक्त व अशुद्ध पाणी पिऊन दिवस काढावे लागत आहेत. यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन अनेक आजारामूळे आयुष्मान कमी होत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असते.जीवनाश्यक गरज असणाऱ्या पाण्यासाठी गावकऱ्यांना आजही पायपीट करावी लागत आहे.गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनाने अजूनही विशेष लक्ष दिलेले नाही. तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री पेयजल योजनेत हस्तांतरित करून नळ योजना सुरू करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना मुंबई येथे मंत्रालयात शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख नितीन सेलोकर, युवक बेरोजगार समितीचे संयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, युवासेना खापा जिल्हा परिषद क्षेत्र विभाग समन्वयक पवन खवास यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :water transportजलवाहतूक