शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १४८ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 28, 2015 23:08 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे.

प्रमोद नागदेवे - भंडाराराष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे. २०१३ मध्ये ४९८ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ६४० जण जखमी झाले. २०१४ मध्ये ४४१ अपघातात १४८ जणांचा मृत्यू तर ६८७ जण जखमी झाले. वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील १४ वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ७,५०० अपघात झाले. यात २,३२८ जणांचा मृत्यू झाला असून १०,२३० जण जखमी झाले. हे अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १३ राज्य मार्गावर घडले आहेत. मागील १४ वर्षात अपघाताच्या सर्वाधिक घटना २००५ मध्ये नोंदविण्यात आले होते. ७९७ अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला तर ७२८ जण जखमी झाले होते. सर्वात कमी घटना २००२ मध्ये घडल्या. त्यावेळी ३४६ अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला तर ४२६ जण जखमी झाले होते.२००१ मध्ये ५१६ अपघातात १८६ जणांचा मृत्यू झाला तर ७१० जण जखमी झाले होते.२००३ मध्ये ५३६ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ८१३ जण जखमी झाले होते. २००३ मध्ये ४५३ अपघातात १६८ जणांचा मृत्यू तर ७५१ जण जखमी झाले होते. २००६ मध्ये ५१० अपघातात १६७ जणांचा मृत्यू तर ८३१ जण जखमी झाले होते. २००७ मध्ये ५८४ अपघातात १६५ जणांचा मृत्यू तर ८११ जण जखमी झाले होते. २००८ मध्ये ५५१ अपघातात १६६ जणांचा मृत्यू तर ८७९ जण जखमी झाले होते. २००९ मध्ये ५२० अपघातात १५८ जणांचा मृत्यू तर ९०१ जण जखमी झाले होते. सन २०१० मध्ये ५४३ अपघातात १७१ जणांचा मृत्यू तर ७२५ जण जखमी झाले. सन २०११ ५१९ अपघातात १५७ जणांचा मृत्यू तर ७१० जण जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये ४९१ अपघातात १६७ जणांचा मृत्यू झाला तर ६१८ जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये ही संख्या घटली.