शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

बाबासाहेबांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी होणार

By admin | Updated: April 12, 2016 00:38 IST

साकोली शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती १४ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत साजरी होणार आहे.

साकोली : साकोली शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती १४ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत साजरी होणार आहे.१४ एप्रिल २०१६ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे सकाळी १० मान्यवतांचे प्रबोधनपर मनोगत, सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ वाटप, त्याचप्रमाणे ५०० बुद्धयान वाटप, मैत्री ग्रुप व माघमाया ग्रुपतर्फे मोफत आरोग्य शिबिर तसेच नागझिरा येथील डोळ्याच्या दवाखान्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर सकाळी १० ते २ नेत्रतज्ज्ञ डॉ.येडे यांच्या मार्गदर्शन तसेच नॅशनल नेटवर्क आॅफ बुद्धीष्ट युथ ग्रुपतर्फे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रदर्शनी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीतर्फे यांनी विहार बांधकामकरीता दान दिला आहे. त्यांना शासनाने तयार केलेले १२५ वी जयंतीनिमित्त १० रुपयांचे शिक्के व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कार्यक्रम् . तसेच मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशिय संस्था रमाई चौक साकोली येथे प्रबोधनात्मक व भाऊ बाबू कव्वाल यांचा संगीतमय कार्यक्रम व विविध स्पर्धा होणार आहेत. महामाया ग्रुपतर्फे त्याच दिवशी सकाळी ९ वाजता बाईक रॅली तालुका स्मारक समिती येथून निघेल. सायंकाळी ४ वाजता समता सैनिक दल मार्च व महारॅलीचे आयोजन एम.बी. पटेल कॉलेज चौकातून होणार आहे. सायंकाळी ५ वाजता होमगार्ड परेड ग्राऊंड येथे महाभोजनदान कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. १५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे सकाळी ६ वाजता सलग १५ तास अभ्यास उपक्रम एन.एन.बी.वाय. ग्रुपतर्फे होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता त्याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर शाक्यमुनी बहुउद्देशिय सेवा संस्था घानोड तर्फे आयोजित केले आहे. तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २१ ला सायंकाळी ६ वाजता कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ तालुका साकोलीच्या वतीने सुफी भीमगीतांचा अनोखा नजराणा कार्यक्रमाचे आयोजन शिलकुमार वैद्य असून त्या अगोदर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणरा असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका स्मारक समिती, मैत्र ग्रुप, महामाया ग्रुप, कॉस्ट्राईब महासंघ, नॅशनल नेटवर्क आॅफ बुद्धिस्ट युथ ग्रुप तसेच मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशिय संस्था यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाकरिता जवळपासचे खेडे गावची जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)