शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

१८८ जागांसाठी १0 हजार ४८२ उमेदवार

By admin | Updated: June 5, 2014 23:48 IST

जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची भरती उद्या दि. ६ जून पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्हा भरासह अन्य जिल्ह्यातून १८८ पदांसाठी ऑनलाईन १0 हजार ४८२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

आजपासून पोलीस भरती : यंत्रणा सज्जभंडारा : जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची भरती उद्या दि. ६ जून पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्हा भरासह अन्य जिल्ह्यातून १८८ पदांसाठी ऑनलाईन १0 हजार ४८२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या आशयाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी आज सायंकाळी पोलीस मुख्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली.अप्पर पोलीस महानिर्देशक यांच्या आदेशांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची कारवाई सुरु आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातही पोलीस शिपाई भरती होत आहे. ही भरती १८८ जागांसाठी असून त्यात अनुकंपाधारकांनाही आरक्षित करण्यात आले आहे. तसेच १८८ पैकी ३0 टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. भरती प्रक्रिया जिल्हा मुख्यालयातील दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे. यात पोलीस कवायत मैदान व चैतन्य क्रीडांगणात घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तथा पारदर्शतेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची सोय करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेत पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक तथा ३२0 पोलीस कर्मचारी पोलीस भरती प्रकियेत सहभागी करण्यात आली आहेत. पोलीस भरतीची व्हीडीओ रेकॉर्डींग करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेच्या प्रसंगी कुठलेही तांत्रिक अडचण किंवा तक्रार प्राप्त झाल्यास या संदर्भात भरती प्रक्रिया मंडळाचा निर्णय अंतिम राहणार आहे. सकाळी ५ वाजतापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून दर दिवशी ५00 उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी पाणी, कँटीन यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जवानांची परीक्षा दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार परीक्षास्थळी कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम बाळगू शकणार नाही. भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नातेवाईकांना परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकार्‍यांनी भरती प्रक्रियेसंबंधी तंतोतंत मार्गदर्शन करण्यात आले असून वशिलेबाजी संदर्भात कुठलीही हयगय होता कामा नये असेही दिशानिर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान शहरात तरुणांचे जत्थे पोलीस भरतीसाठी दाखल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)