शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

आपल्यासाठी आणि पृथ्वीसाठी फळांचा आहार चांगला का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:20 IST

अगदी आदमनेसुद्धा फळापासून सुरुवात केली. फळ हे निसर्गाने अन्न म्हणूनच तयार केले आहे.

प्रश्न: सद्गुरु, तुम्ही म्हटले आहे की आपण काय खातो याचा आपल्या मानसिक परिस्थितीवर परिणाम होतो. वैद्यकशास्त्र सांगत आहे की फलाहारामुळे मानसिक कल्याण कसे होते. याला कितपत महत्व आहे? आणि नियमितपणे काम, कुटुंब किंवा बर्‍याच शारिरीक हालचाली असणाऱ्या लोकांसाठी फलाहार योग्य असतो का?सद्गुरू: कोणत्याही मशीनमध्ये, ते कोणत्याही प्रकारच्या इंधनावर चालत असेल तरीही, इंधनाची कार्यक्षमता मूलत: त्याचे ज्वलन किती सहजपणे होते यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, तुम्ही साध्या गाड्यांसाठी ज्या प्रकारचे पेट्रोल वापरता ते रेस कार किंवा विमानात वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल पेक्षा वेगळे आहे कारण त्याच्या जाळण्यातला सहजपणा वेगळा आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल ची पातळी पाहिली असेल - सत्याऐंशी, एकोणऐंशी, नव्वद, एक्याण्णव, त्र्याण्णव, शहाण्णव. जेव्हा आम्ही मोटारसायकल चालवित होतो, तेव्हा आम्ही तिप्पट पैसे देऊन उच्च प्रतीचं पेट्रोल विकत घ्यायचो कारण अचानक मोटरसायकल इतरांना जमणार नाही अश्या रीतीने काम करू लागते.

पचनासाठी चांगली असलेली फळं

याचप्रमाणे, सर्वात सहज पचण्याजोगे अन्न म्हणजे फळ. पचन म्हणजे जठराग्नि - पाचक अग्नी. जर हा अग्नी प्रभावीपणे जळायचा असेल तर फळ नक्कीच सर्वात चांगली गोष्ट आहे. दुर्दैवाने, बरेच लोक सुस्तपणा आणि जडपणाचा आनंद घेतात. आयुष्याने त्यांना स्पर्श केला नाही म्हणून ते त्यांचा एक भाग मृत असल्याचा आनंद घेतात. झोप, नशा, जास्त खाणे आणि झोपणे; हे जिवंत, सक्रिय आणि गतिशील असण्यापेक्षा बरे वाटते. फळ केवळ अशा व्यक्तीसाठी समस्या असू शकते कारण ते आपल्याला जागृत आणि जागं ठेवते. जोपर्यंत ते आंबत नाही तोपर्यंत ते तुम्हाला झिंगवत नाही! आणि एखाद्यास आनंद, नशा आणि अतीव सुख हे जागरूकतेच्या तीव्र पातळीवरुन देखील जाणवते. पण आता प्रश्न आहे की मी फळ खाऊ सुद्धा सामान्य राहू शकतो का?

निसर्गाने फलाहारच ठरवलेला होता

एक सामान्य उत्तर आपल्या सामान्य जीवनातच आहे. समजा तुम्ही आजारी असाल हॉस्पिटल मध्ये तर कोणीही तुम्हाला चिकन बिर्याणी आणणार नाही. ते फळ देतील कारण तुमचे मित्र व नातेवाईक समजतात की, “तुम्ही हे सर्व खाऊन आजारी पडलात निदान आता तरी समजूतदारपणाने खा.”

तुम्हाला माहिती आहे का, अगदी आदमने सुद्धा फळापासून सुरुवात केली. फळ हे निसर्गाने अन्न म्हणूनच तयार केले आहे. बी हा आंब्याचा महत्त्वाचा भाग आहे. गर हा फक्त आकर्षित करण्यासाठी असतो, ते एक आमिष आहे जेणेकरून प्राणी आणि पक्षी ते खातील आणि बी कुठेतरी दूर नेतील.फळं खायचा सर्वात चांगला काळ कोणता?

हंगामानुसार, विविध फळे आहेत. हे अविश्वसनीय आहे की एका विशिष्ट वेळी जी फळ तयार होतात ती फळे सिस्टमसाठी सर्वात योग्य असतात. याबद्दल बराच अभ्यास केला गेला आहे - कि त्या ऋतूसाठी जेव्हा थंडी असते, गरम असताना, जेव्हा आर्द्रता खूप जास्त असते, त्या वेळी तुम्ही त्या भागातील अन्न खात असाल तर योग्य प्रकारचे फळ पृथ्वी तुम्हाला देईल. पण आता तुम्ही न्यूझीलंडहून आलेले फळ खात आहात. ही वेगळी बाब आहे. जर तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रदेशातून येणारे अन्न खात असाल तर तुम्हाला दिसेल की योग्य हंगामात योग्य प्रकारचे फळ तुमच्याकडे येत आहे. त्यावेळी ते खाणे सर्वात चांगली गोष्ट आहे.

फलाहार करताना घ्यावयाची काळजी

फळ शरीरासाठी चमत्कारिक गोष्टी करु शकतं. एखादी व्यक्ती आपली जीवनशैली कशीही असली तरी ती खूपच जिवंत आणि सक्रिय होऊ शकते. परंतु जर आपण अत्यंत शारीरिकदृष्ट्या मागणी असलेल्या नोकरीमध्ये असाल तर - उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज खोदाईचे काम करत असाल, एखाद्या मशीनद्वारे नव्हे तर शारीरिकदृष्ट्या आणि कठोर परिश्रम घेत असाल तर - दर दोन तासांनी तुम्हाला भूक लागलेली असेल. तितकेच फळ तुम्ही खाऊ शकता, परंतु ते इतके वेगाने पचते की तुमचे पोट रिकामे वाटू शकते.जर तुम्ही संपूर्ण फलाहार घेत असाल तर तुम्हाला दुपारच्या जेवणावर आणखी थोडा वेळ घालवावा लागेल आणि हळूहळू खावे लागेल जेणेकरून तुम्ही पुरेसे फळ खाऊ शकता. थोड्याशा फळांनीही तुम्हाला कदाचित पोट भरल्यासारखे वाटेल कारण ते सहसा गोड असते, म्हणून तुम्हाला थांबावे लागेल आणि हळूहळू खावे लागेल. आपल्यात बायो-क्लॉक देखील आहे. समजा तुम्ही सामान्य शिजवलेले जेवण खाण्यास दहा ते बारा मिनिटे घेत होता. जरी तुम्ही फळ खाल्ले तरी, जेव्हा तुम्ही दहा ते बारा मिनिटांपर्यंत पोहोचाल, तेव्हा तुमचे शरीर म्हणेल की तुम्ही पुरेसे खाल्ले आहे. म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक अधिक खावे लागेल कारण शरीर पोट भरण्याकडे पहात नाही, ते फक्त वेळ पाळत आहे.

जर तुम्ही फक्त फळांच्या आहारावर असाल आणि शारीरिकदृष्ट्या खूप सक्रिय असाल तर तुम्हाला दिवसातून तीन वेळा जेवण्याची आवश्यकता पडू शकेल. जर तुम्ही सहा किंवा आठ तास झोपत असाल तर उर्वरित सोळा ते अठरा तासांसाठी, जर तुम्ही फळ खात असाल तर तीन वेळा खाणे पुरेसे आहे. परंतु दोन तासाच्या आत पोट रिकामे होईल, म्हणून तुम्हाला उच्च शक्तीसह परंतु रिकाम्या पोटी असण्याची सवय लावावी लागेल. याच वेळी तुमचा मेंदू उत्कृष्ट कार्य करतो आणि एक मनुष्य म्हणून तुम्ही उत्कृष्ट कार्य करता.

जर तुम्हाला तुमचं डोकं वापरायचं असेल किंवा शारीरिक कष्ट करायचे असतील, फळं उत्तम कार्य करतील. परंतु बाजारात मिळणाऱ्या फळांमध्ये काय भरलेले असते हे तुम्हाला माहित नाही. ही जरा समस्या आहे. मला स्पष्टपणे हे जाणवतं की आम्ही लहान असताना ज्या प्रकारची फळं खायचो त्यातुलनेत आज शेतात पिकवलेली जीफळं आपल्याकडे येतात ती तशी नाही. ती अधिक मोठी, गोलाकार आणि दिसायला चांगली आहेत, हे प्लॅस्टिक सर्जरी सारखं आहे.

मला हे अगदी स्पष्टपणे जाणवतं की त्या प्रकारची शक्ती आणि जिवंतपणा नाही. ही फळं बाजारासाठी तयार केली आहेत, माणसांसाठी नाही. याचा अर्थ नाही कि ती अगदीच टाकाऊ आहेत, परंतु ती आधीसारखी पौष्टिक नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याच्या जोडीला काही प्रमाणात वेगळ्या अन्नाची गरज भासू शकते.

फलाहार पृथ्वीसाठी चांगला आहे

या सगळ्यापेक्षा, हेअन्न पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय शहाणपणाचा मार्ग आहे. प्रत्येकाने कमीतकमी तीस टक्के फलाहारी व्हायला हवं- म्हणजे जेवणात कमीतकमी तीस टक्के भाग फळांचा हवा. जर तुमच्या अन्नाचा तीस टक्के भाग हा नांगरलेल्या जमिनीतून आणि पिकांपासून न येता झाडांपासून आला तर पर्यावरणाच्या दृष्टीने याचा खूप मोठा फरक पडेल.

जर तुम्ही मांसाहारापासून फलाहाराकडे वळणार असाल तर तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीच खाल्लेलं नाही कारण तुम्हाला खूप जड अन्न खायची सवय आहे जणू काही धरती तुम्हाला ओढत आहे. तसही धरती तुम्हालाओढणारच आहे तुम्ही मराल तेव्हा. परंतु, जेव्हा आपण असं काही भरारतो जणू काही आपण या पृथ्वीचा भागच नाही, आत्ता आपण याला जीवन म्हणतो. आकाशात उंच उडणारा पक्षी देखील या पृथ्वीपासून तयार झाला आहे, पण जेव्हा तो आकाशात भरारी घेत असतो तेव्हा मात्र तो पृथ्वीसारखा दिसत नाही. कोणताही जीव जेव्हा अंकुरतो तेव्हा त्याने मातीसारखे नाहीच दिसले पाहिजे जरी आपण शेवटी तिचाच भाग असलो तरी.

जर आपल्याला भरारी घ्यायची असेल तर जे इंधनरूपी अन्न आपण खाऊ ते पटकन जळणारे हवे. ते सर्वोत्तम अन्न आहे. आपल्या पोटात फळ सर्वाधिक वेगाने पचते यात शंका नाही. याचा अर्थ त्यात कमीतकमी टाकाऊ पदार्थ असतात आणि शारीरिक प्रणाली वर कमीतकमी ताण आणते.