साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२३ ते २९ मार्च===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी दिलासादायक असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनाने उपासना करा. प्रयत्नांना प्रार्थनेची जोड द्या.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. वादविवाद, स्पर्धा, मतभेद आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही शांत राहण्याची आहे. उग्रपणे, अविचाराने निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. आवाक्याबाहेरची लढाई लढायला जाऊ नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. "विकास हा नेहमी प्रतिकूल परिस्थितीतूनच होतो" हे लक्षात ठेवून वागा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक जडणघडणीचा असणार आहे. इतरांच्या मदतीने निश्चितच एक टप्पा गाठला जाईल. सक्षम आणि स्थिर वाटेल. प्रयत्नांना यश येईल. तुम्ही केलेल्या कामाला ओळख मिळेल. घर, जमीन, गाडी, नोकरी, व्यवसाय किंवा इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये चांगली प्रगती होईल, संपन्नता राहील.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात संपूर्ण लक्ष देऊन, जीव ओतून आणि भरपूर कष्ट करून पुढे जाण्याची गरज आहे. कामामध्ये परिपूर्णता आणायचा प्रयत्न करा. इतरांच्या मदतीने, सोबतीने पुढे चाला. कोणीतरी दिलेल्या सूचना अंमलात आणा. इतरांना तुम्ही देखील मदत करा. एकट्या पेक्षा मिळून मिसळून काम करा. "एकीचे बळ" लक्षात ठेवा!
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.