शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:07 IST

Spiritual : निरभिमान राहाणे, सदोदित भजन व नामस्मरण करणे आणि संत-सज्जन-सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ.

परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. अंतयार्मी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. देवाचे नाव घ्यावे, नीतीधमार्चे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमात्मा म्हणतात. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष - मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप पाहणे, निरभिमान राहाणे, सदोदित भजन व नामस्मरण करणे आणि संत-सज्जन-सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ.

' मी नाही आणि तो म्हणजे भगवंत आहे ' किंवा ' मी तोच म्हणजे भगवंत आहे ' असे जाणणे आणि तसे कृतीत घडणें, हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार असून सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, तर असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ, तर विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच.' मी कर्ता आहे ' ही प्रपंचातली पहिली पायरी, ' तर राम कर्ता आहे ' ही परमार्थातील पहिली पायरी आहे. प्रपंचात जसा पैसा लागतो, तसा परमार्थांत भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, तसे परमार्थातही भाव असल्याशिवाय  होत नाही. वासनेने युक्त परमार्थ म्हणजेच प्रपंच, तर वासनारहीत प्रपंचसुध्दा परमार्थ होय.  प्रपंचात प्रसिध्दीची जरूरी वाटते, तर परमार्थांत गुप्ततेची जरूरी लागते.काळजी, तळमळ आणि दु:खे ही प्रपंचाची लक्षणे आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे परमाथार्चे लक्षण आहे. परमार्थांत अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, तर प्रपंचातील अहंकार दूर झाला तर तो परमार्थच होय. नाकासमोर चालणे हा परमार्थ आणि वारा येईल तशी पाठ देणे हा प्रपंच. प्रपंचात जितके कष्ट करतो त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही, पण परमार्थांत तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. प्रपंच कठीण आहे कारण; त्यात मिळवायचे असते, तर परमार्थ सोपा आहे; कारण त्यात गमवायचे असते. मी पुष्कळांचा आहे हे मिळवणे, तर मी कोणाचाच नाही हे गमावणे. आपण स्वत:हाच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुस-याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे, तशी परमार्थांत श्रध्दा पाहिजे.

-जगदिश रायणेखामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक