शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 25, 2021 12:52 IST

विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.

आम्रवृक्ष मोठ्या डौलदारपणे उभा होता. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच बाजूचे गवताचे पाते हलले. त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले.  ते हसू छद्मीपणाचे होते. त्याला अहंकाराचा वास तर भरपूर होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले. आम्रवृक्ष त्याला म्हणाला, 'किती नाजूक रे तू? मी मात्र लहानपणापासून कणखर बरं का! नमणं, वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!' 

त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, 'भीती वाटत नाही, हे ठीक आहे. परंतु विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.' यावर तो आम्रवृक्ष खदाखदा हसून म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काही खरं नसतं. सगळं काही मीच. आता हेच बघ ना! माझी इच्छा नव्हती म्हणून नाही हललो मी, आता मी तुला हलून दाखवतो बघ!' असे म्हणून तो गदागदा हलू लागला.

परंतु गवताच्या पात्याच्या लक्षात आले, केवळ अचानक सुटलेल्या वादळामुळेच तो हलत होता. परंतु अहंभावामुळे त्याला त्याची जाणीव नव्हती. पाहता पाहता वादळवारा वाढला. सगळ्या वातावरणाला घाबरवणारा, थरकाप उडवणारा विचित्र वेग आला. पाहता पाहता आंब्याचे झाड उन्मळून पडले आणि परमेश्वरावर विसंबून असलेले नाजूक, छोटे गवताचे पाते मात्र नम्रतेने तसेच तग धरून उभे होते. तेही वंदनीय होऊन.

म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे, 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.' तसेच,समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, 

जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेधी,तया भोजनाची रुचि प्राप्त कैची,अहंभाव ज्या मानसीचा विरेना,तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना।। श्रीराम।।